कौतुकास्पद गंगापूरचे आकाश लक्ष्मण माघाडेे नेत्रचिकित्सा सहाय्यक परीक्षेत राज्यात प्रथम


गंगापूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण ,संशोधन संचालनालयाच्या वतीने नेत्रचिकित्सा सहाय्यक या पदाकरता घेण्यात आलेल्या परीक्षेत आकाश माघाडे यांनी मागास प्रवर्गातून राज्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला १४ जून २०२३ रोजी घेण्यात आलेल्या दोन जागे साठीच्या परीक्षेत एक खुल्या प्रवर्गासाठी व एक मागास प्रवर्गासाठी परीक्षा घेण्यात आली, यामध्ये मागास प्रवर्गातून आकाश माघाडे हे राज्यातून प्रथम आले.गंगापूर येथील सर्वसामान्य कुटुंबातील व एका एस.टी.कर्मचाऱ्यांच्या मुलाने बुद्धीच्या जोरावर मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.अतिशय जिद्दी, प्रामाणिक, हुशार, आपल्या कर्तव्याप्रती समर्पण असलेल्या आकाश यांच्या निवडीबद्दल त्यांच्या कुटुंबासह नातेवाईक, मित्रमंडळी, गंगापूर व मांजरीतील रहिवासी यांनी आनंद व्यक्त केला.गंगापूर शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या आकाश ऑप्टिकल चे संचालक आकाश माघाडे यांनी अल्पवधीत आपले नावलौकिक कमावलेले आहे.कारण त्यांनी मोफत नेत्र तपासनी शिबिर धार्मिक, राजकीय व सामाजिक व छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व सर्व राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात मोफत शिबिरे घेऊन गोरगरिब रुग्णांची सेवा त्यांनी केली.त्यांची नेत्रचिकित्सक म्हणुन प्रथम नियुक्ती मुंबई येथील जे.जे. रुग्णालयामध्ये करण्यात आल्याने गंगापूर सह गंगापूर परिसरातील सर्व रुग्णांनी आनंद व्यक्त केला असून त्यांना पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!