गंगापूर तालुक्यात श्रीमहालक्ष्मी उत्सव तीन दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा…….घराघरात धार्मिक वातावरण निर्माण झाले,जड अंतःकरणाने दिला जेष्ठा, कनिष्ठा गौराईंना निरोप

गंगापूर तालुक्यात श्रीमहालक्ष्मी उत्सव तीन दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा….

घराघरात धार्मिक वातावरण निर्माण झाले,जड अंतःकरणाने दिला जेष्ठा, कनिष्ठा गौराईंना निरोप

गंगापूर (प्रतिनिधी) मांगल्याचे प्रतीक धनधान्यास बळकटी व ईच्छीत मनोकामना पुर्ण करणार्या गौराईंचा उत्सव तालुक्यात मोठ्या भक्तीभावाने व मंगलमय वातावरणात व उत्साहात साजरा करण्यात आला.
महालक्ष्मी समोर आरास व देखावे तयार करण्यात आले होते जामगांव येथील शिवप्रसाद बन्सोड यांनी संतांचा महिमा हा देखावा सादर केला होता तीन दिवस मंगलमय वातावरण निर्माण झाल्याचे बघायला मिळत होते..


गुरुवार पारंपरिक वेशभूषेत सायंकाळी सुवासिनी महिलांनी नवुवारी साडी नेसून लहान थोरांनी हातामध्ये ताट तांब्या ढोल वाजवत महालक्ष्मीचे जल्लोषात स्वागत केले.लक्ष्मी कशाने आली? सोनपावलाने आली असे म्हणत तुळशी वृंदावनापासुन सोनपावलाने येणा-या गौराईचे मुखवटे घरात नेण्यात आले व आनंदमय वातावरणात अनुराधा नक्षत्रावर सजवलेल्या मखरात जेष्ठा कनिष्ठा व त्यांच्या बाळांची स्थापना करण्यात आली.

तालुक्यात अनेकांच्या स्वगृही स्थापना करण्यात आलेल्या श्रीमहालक्ष्मीची सपत्निक महापुजा केली व सामुहीक महाआरती करून सोळा प्रकारच्या भाज्या कोशींबिर पंचाअर्म्रुत खिर पुरणपोळी असे विविध पदार्थ बनवुन देविला नैवेद्य दाखविण्यात आला..


यावेळी सर्वानी गौरी गणपती जवळ साष्टांग दंडवत घालुन दरवर्षी असेच दणक्यात आगमन होऊ द्या व सर्वत्र चांगल्या प्रकारे पाऊस पडु दे सर्व स्रुष्टी सुजलाम सुफलाम होऊ दे अशी मनोकामना श्री महालक्ष्मीच्या चरणी भाविकांनी केली.यावेळी वरून राजाने देखील तीन दिवस जोरदार हजेरी लावल्याने भाविकांमध्ये देखील मोठ्या चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. माहेरवाशीन म्हणून आलेल्या जेष्टा कनिष्ठा गौरींईच्या आगमनामुळे सर्व घराघरांमध्ये तीन दिवस पवित्र व आनंददाई वातावरण बघायला मिळत होते. या उत्सवानिमित्त बाहेरगावी गेलेले घरातील कुटुंब एकत्र आले होते त्यामुळे वातावरण अधिकच द्रुढ झाल्याचे दिसुन येत होते.
सायंकाळी दर्शनासाठी आलेल्या महिला भगिनींनी श्रीमहालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. व हळदीकुंकु वाहुन आशिर्वाद घेतले. अशा या अनुराधा नक्षत्रावर आगमन झालेल्या महालक्ष्मी जेष्टा कनिष्ठा गौरींचे बाळमुर्तीसह शनिवार रोजी भावपुर्ण वातावरणात जड अंतकरणाने निरोप देण्यात आला व पुढील वर्षी लवकर या अशी याचना करण्यात आली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!