आदर्श अभियंता पुरस्काराने जामगावचे बाबासाहेब मंडलिक सन्मानित

आदर्श अभियंता पुरस्काराने जामगावचे बाबासाहेब मंडलिक सन्मानित


गंगापूर (प्रतिनिधी)
राज्य शासनाच्या “उत्कृष्ट अभियंता ” पुरस्काराने गंगापूर तालुक्यातील जामगांवचे विद्युत शाखा अभियंता बाबासाहेब मंडलिक व अलकाताई मंडलिक यांचा सपत्नीक मुंबई येथे सन्मान करण्यात आला .

मुंबई येथील षण्मुखानंद हॉल मध्ये भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्म दिना निमित्तच्या “अभियंता दिनी” सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते बाबासाहेब मंडलिक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला . यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव. मनोज सौनिक, सचिव एस. एस . साळुंखे, सचिव पी. डी . नवघरे, रस्ते विकास महामंडळाचे सचिव अनिल गायकवाड, सचिव के . टी . पाटील आदी मान्यवर उपस्थित होते .

बाबासाहेब मंडलिक यांनी २००३ मध्ये अहमदनगर येथून सेवाकाळ सुरू केला. पुढे २००३ ते २०२३ पर्यंत नगर छत्रपती संभाजीनगर,जालना परभणी जिल्ह्यातील येथे विद्युत शाखा अभियंता म्हणून उत्तम काम केले असून सध्या जालना येथे सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागात कार्यरत आहेत त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील कर्करोग हाॅस्पिटल अहमदनगर, हिंगोली न्यायालय व राजुर गणपती येथील मंदीर परिसरात विद्युत रोषणाईचे काम सुरू आहे .
त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल संजय तुपलोंढे, सुनील बोराटे, डॉ दिलीप वाकडे, डॉ गोरखनाथ तूपलोंढे, बापू भडके, हंसराज काळे, किशोर नवगीरे, माऊली माने, लक्ष्मण शेळके आदींसह जामगांव ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!