शासनाने मल्लिकार्जुन डिस्टिलरी हस्तांतरण प्रकरणात लक्ष वेधुन कामगारांना योग्य मोबदला व थकित वेतन, फंड, ईतर देय देन्याचे आदेशीत करावे नसता २४ जानेवारीला उपोषणाला बसणार


गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर तालुक्यातील बाबरगांव येथील मलीकार्जुन डिस्लीरिज प्रा. लि.यांनी बेकायदेशीर रित्या कंपनी हस्तांतरीत केली व कामगार व कर्मचारी यांची फसवणुक करून त्यांना त्याचे कायदेशीर हक्कपासुन वंचित ठेवण्यात आले कामगार व कर्मचारी यांना थकीत असलेला पगार न देता नविन कामगार भरती करण्याची जाहीरात प्रसिद्ध केली तसेच कामगारांना कामावर न घेता थकीत वेतन दिले नसून, बंद काळातील वेतन प्रायव्हेट फंड आदीचा लाभ नियमानुसार देण्यात यावे अन्यथा २४ जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा कामगार कर्मचारी यांनी निवेदनात दिला आहे.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गंगापूर तालुक्यातील बाबरगांव येथील मे. मलीकार्जुन डिस्लीरिज प्रा. ली.मधील कामगार व कर्मचारी या कारखान्यात अनेक वर्षापासुन काम केले कारखाना हा कारखाना सन २०१२ मध्ये बंद झाला असुन तेव्हा पासुन कामगार व कर्मचारी यांचे वेतन कारखान्याकडे थकीत आहे. वेतन मिळावे म्हणून वारंवार अनेक कार्यालयामध्ये आमचे हक्काचे पगार मिळणे कामी व इतर लाभ मिळणे कामी संबंधित विभागाकडे तोंडी व लेखी तक्रार करण्यात आली मात्र आजपर्यंत फक्त आश्वासनाची खैरात देवुन वेतन व इतर लाभ देण्यास जाणुन बुजुन टाळाटाळ करण्यात आली मे. मलीकार्जुन डिस्लीरिज प्रा. लि. च्या मालकांनी कामगार व कर्मचाऱ्यांना एक दमडी न देता बेकायदेशीर रित्या कारखाना हस्तांतरण करण्यात आले एवढेच नव्हे तर नविन कामगार भरती करण्याची जाहीरात देखील प्रसिद्ध केली .त्यामुळे या कामगारांची फसवणुक होवुन उपासमारीची वेळ आली असून एक प्रकारे अन्याय
झाला असल्याने तत्काळ थकीत वेतन द्यावे बंद काळातील वेतन प्रोव्हीडंट फंड आदीचा लाभ 23 जानेवारी पर्यंत नियमानुसार देण्यात यावे अन्यथा २४ जानेवारी रोजी गंगापूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा कामगार कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.निवेदनावर नबाब शेख, विलास राऊत,कीशोर काकडे,विजय जिवरक, शिवनाथ शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!