काल जीवघेणा हल्ला झालेल्या घटनास्थळाजवळ सापडले प्रतिबंधित गोवंशाचे अवशेष पोलीसांनी जप्त करून केले नष्ट.एकावर गुन्हा दाखल

गंगापुर (प्रतिनिधी) मौजाबाद शिवारात प्रतिबंधित गोवंशाचे अवशेष असल्याची माहिती मिळाल्यानंतर काही गोरक्षक घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी घटनास्थळावरून गोवंशाचे अवशेष पोलीसांनी जप्त करून नष्ट केले. एका आरोपी विरोधात गुन्हा दाखल.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार १५ जानेवारी रोजी बोलेगाव कडे जाणाऱ्या रोडलगत मौजाबाद शिवारातील गट नं २५ मध्ये अवैध कत्तलखाना सुरु असुन गोवंशांची कत्तल करत असल्याच्या संशयातून काही तरुणांनी तुर सोंगणा-या एका जणास जबर मारहाण केल्या प्रकरणी गंगापुर पोलिसांत सहा जणा सह इतर जणांवर जीवघेणा हल्ला केल्याने गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने घटने नंतर काही वेळाने पोलीस घटनास्थळी पंचनामा करण्यास गेले असता सदरील तुरीच्या शेतामध्ये असलेच्या बंदीस्त पत्र्याच्या शेड मधून दुर्गंधी येत असल्याने पाहणी केली असता तिथे गोवंश प्राण्यांचे शिंगे हाडे व इतर अवयव मिळून आल्याने पोलीसांनी सदरचे अवशेष पंचनामा करून जप्त केले तसेच पशुवैद्यकीय अधिकारी राजशेखर दडके यांच्या समक्ष व्हिसेरा साठी नमुने घेऊन उर्वरीत अवशेष जेसीबीच्या सहाय्याने जमीनीत खोल खड्डा घेऊन नष्ट केले. हि कारवाई सायंकाळी उशीरापर्यंत चालू होती. याप्रकरणी सरकारतर्फे गंगापुर पोलीस स्टेशनचे कर्मचारी राहुल वडमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेतमालक जब्बार मन्नान कुरेशी वय 38 वर्षे रा. कुरेशी गल्ली गंगापुर याच्या विरुद्ध भादवी कलम ५ (ब) ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो.नि. सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार के एल शेळके करीत आहेत.

परिसरात दुर्गंधी सुटल्याने उघड झाली घटना.

शेताच्या आजुबाजुच्या परीसरात कायम दुर्गंधी येत होती मात्र तिथे कोणास येऊ दिले जात नव्हते मात्र कुणकुण लागल्याने गोरक्षक दलाचे काही तरुण तेथे गेले होते मात्र तिथे नंतर हाणामारी झाली अशी माहिती परीसरातील एका शेतकर्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!