डोणगावच्या शाळेतुन रायपूर येथील दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थीनीचे अपहरण

गंगापुर (प्रतिनिधी)
एका दहावीच्या सोळा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील रायपुर येथील एका सोळा वर्षीय मुलगी डोणगाव येथील लोकनेते साहेबराव डोणगावकर विद्यालयात १० वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. १७ जानेवारी रोजी त्या मुलीला सकाळी ९:३० वाजता वडिलांनी शाळेत आणून सोडल्यानंतर तीला कोणीतरी अज्ञात इसमाने पळून नेले आहे.त्या अल्पवयीन मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीनुसार शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरोधात भा. द. वी कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार वाघ हे पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!