शिक्षक संघाचा २ आक्टोंबरचा महा आक्रोश मोर्चा हा पगार व भत्यासाठी नाही तर आम्हाला फक्त शिकवु द्या- राजेश हिवाळे.

शिक्षक संघाचा महा आक्रोश मोर्चा हा पगार व भत्यासाठी नाही तर आम्हाला फक्त शिकवु द्या- राजेश हिवाळे.

सरकारी शाळेचे खाजगीकरण व अशैक्षणिक कामाच्या विरोधात प्राथमिक शिक्षक संघाचा एल्गार.

आम्हाला फक्त शिकवू द्या ची आर्त हाक देत आक्रमक होत शिक्षक संघ उतरला मैदानात.

छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर २ आक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाभरातील शिक्षक थेट धडकणार.

गंगापूर (प्रतिनिधी) शाळाबाहय अशैक्षणिक कामे बंद करा व “आम्हाला फक्त शिकवु द्या” ची आर्त हाक देत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या आदेशानुसार राज्य संपर्कप्रमुख मधुकर वालतुरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमवार २ ऑक्टोंबर रोजी महा आक्रोश मोर्चा काढण्यात येत असून जिल्हाभरातील हजारो शिक्षक थेट छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहेत .
महा आक्रोश मोर्चाच्या नियोजनाकरिता बोलावण्यात आलेल्या गंगापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत बोलतांना शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे यांनी हा मोर्चा पगार व भत्यासाठी नाही तर आम्हाला फक्त शिकवु द्या म्हणून असल्याचे प्रतिपादन केले.
गंगापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळाची बैठक गंगापूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात सुनिल साळवे यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे,चेअरमन जालिंदर चव्हाण,दिलीप आळंजकर,अंकुश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार २३ रोजी संपन्न झाली.
यावेळी बोलताना राजेश हिवाळे पुढे म्हणाले की,या जगात शक्तीची पूजा केली जाते दुर्बलाची नाही त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांनी व्हाट्सअपवर शुभेच्छा देऊन पाठिंबा न दर्शविता प्रत्यक्षात सक्रिय सहभाग नोंदवून शिक्षकांच्या एकजुटीची ताकद दाखवावी.ही लढाई केवळ शिक्षकांची नसून पालक व ग्रामस्थांची देखील आहे.त्यांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून साथ द्यावी.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे,चेअरमन जालिंदर चव्हाण,दिलीप आळंजकर,सुनिल साळवे,अंकुश जाधव,संतोष आळंजकर,लक्ष्मण उबाळे,सुनिता कोटुरवार,सतीष कबाडे,कल्याण राऊत,सागर घोणशेट्टे,संदीप शिरकुले,तिलकेश्वर सिरसाट, सचिन वालतुरे,प्रदीप जाधव,विनोद डीके,आबासाहेब सोनवणे,संदीप मनाळ,संदीप काळे यांच्यासह जिल्हा,तालुका शाखेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आहेत प्रमुख मागण्या.
१. शाळाबाह्य अशैक्षणिक कामे बंद करा व आम्हाला फक्त मुलाना शिकवू दया.
२. मुख्यालयी राहण्याची अट रद्द व्हावी.
३. जुनी पेन्शन लागू करण्यात यावी.
४. शिक्षणाचे खाजगीकरण थांबवावे.
५. शाळा बचावासाठी सरकारी शाळा कार्पोरेट कंपन्याना न देणे.
६. बीएलओ कामासाठी शिक्षकांना वेठीस न धरता त्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी.
७. वस्तीशाळा शिक्षकांना शाळा स्थापनेपासून नोकरीत कायम करण्यात यावे.
८. संच मान्यता त्रुटी दूर करण्यात यावी.
९. बदली प्रक्रिया त्रुटी दूर करावी.
१०. नवीन शिक्षक भरतीपूर्वी जिल्हांतंर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यात यावी.
११. नवीन शिक्षक भरती करण्यात यावी.
१२. MS-CIT अट शिथिल करण्यात यावी.
१३. शिक्षकांना १०-२०-३० आश्वासित प्रगती योजना लागु करावी.
१४. सर्व थकित बिलासाठी त्वरीत अनुदान मिळावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!