मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा. पुन्हा लासुरस्टेशन येथे साखळी उपोषणाला सुरुवात.. पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला..

गंगापूर (प्रतिनिधी)मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत पुन्हा लासुरस्टेशन येथे साखळी उपोषणाला सुरुवात त्याच बरोबर पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला

लासुरस्टेशन परिसरातील अनेक गावात आमदार, खासदार, मंत्री व राजकीय पुढारी यांना गावबंदी करणारे बॅनर लावुन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लासुरस्टेशन परिसरातील वैरागड,धामोरी खुर्द,माळीवाडगाव,देर्हळ,शंकरपुर,खादगाव,पाडळसा,बाभुळगाव नागरे, पोळ राजनगाव, गाजगाव, सिंदी सिरसगाव,फतुलाबाद , वसुसायगाव,राहेगाव, लासुरगाव,सोनवाडी,उंदिरवाडी,भायगाव गंगा,मांडकी, लाखनी,जांबरखेडा,वायगाव,काटे पिंपळगाव,भागाठान, सिल्लेगाव,देवळी,शहापुर,पळसगाव, गवळीशिवरा गावे आता हळूहळू एकवटू लागली आहेत.

सकल मराठा समाज लासुरस्टेशन पंचक्रोशीच्या वतीने २६ ऑक्टोबर पासुन परिसरातील गावे साखळी उपोषण बसणार आहेत त्यांनतर आंदोलन तीव्र करण्यासाठी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील समाज बांधवांनी आपली एकजुट दाखवण्यासाठी छञपती शिवाजी महाराज स्मारक लासुरस्टेशन येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आहवान सकल मराठा समाज लासुरस्टेशन पंचक्रोशीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!