गंगापूर वैजापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना शासनाने हेक्टरी तीस हजार रुपये अनुदान द्यावे नसता तीव्र आंदोलन छेडणार:- कृष्णा पाटील पऱ्हाड

शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजार रुपये पेक्षा जास्त मदत जाहीर करा नसता झुंजार छावा संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा


गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर वैजापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना शासनाने हेक्टरी तीस हजार रुपये अनुदान द्यावे नसता तीव्र आंदोलन छेडणार:- कृष्णा पाटील पऱ्हाड

अप्पर तहसीलदार आकाश दहादडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गंगापूर व वैजापूर तालुक्यातील पावसाचा पन्नास ते साठ दिवसाचा खंड पडल्यामुळे मका, भुईमूग,मूग, कपाशी व इतर सर्वच पिकांचे खूप नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना घरातून पैसे टाकावे लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यानंतर सप्टेंबर मध्ये काही भागात अति मुसळधार पडलेल्या पावसामुळे कपाशी पिकाचे सर्व पाते गळून गेले व लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे खूप नुकसान झालेले आहे.त्यामुळे शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासनाने हेक्टरी तीस हजार रुपये अनुदान द्यावे .अशी मागणी कृष्णा पाटील पऱ्हाड व राजीव पाटील खिल्लारे यांनी केली आहे. मा. तहसीलदार साहेब आपण जर पंधरा दिवसाच्या व दिवाळी सणाच्या आधी नुकसान भरपाई पोटी तीस हजार रुपये अनुदान शेतकरी बांधवांना दिले नाही तर मराठवाडा अध्यक्ष कृष्णा पाटील पराड राजीव पाटील खिल्लारे मराठा सेवा संघ जिल्हा कार्याध्यक्ष, संदीप पाटील आढाव मा. संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती लासुर, युवराज पाटील पवार झुंजार छावा संघटनेच्या वतीने गंगापूर तहसील कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!