लोकसभा निवडणुकीत २ हजार २०५ कर्मचाऱ्यांना मतदान यंत्र हाताळणीचे दोन दिवस दिले जाणार प्रशिक्षण.


गंगापूर (प्रतिनिधी) ५२३मतदान केंद्राध्यक्ष व १ हजार ६८२ मतदान अधिकारी यांना मतदान यंत्र हाताळणीचे दोन दिवस प्रशिक्षण देण्यात येणार या प्रशिक्षणाला टाळाटाळ व गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०२४ साठी १९-छत्रपतीसंभाजीनगर लोकसभा मतदार संघ अंतर्गत १११ गंगापूर चे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणी व इतर अनुषंगिक बाबींच्या संदर्भात दिनांक ६ एप्रिल व दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० ते सायं ५.३० वाजता निवडणुक प्रशिक्षणाचा पहिल्या टप्प्याचे भोंडवे पाटील पब्लिक स्कुल गट नं ४९ वाळूज एम आय डी सी बजाजनगर जि. छत्रपतीसंभाजीनगर येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण चार सत्रात होणार असुन पहिले सत्र दिनांक ६ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता एकूण ५२३ मतदान केंद्राध्यक्षांचे होणार आहे. दुसरे सत्र दुपारी १.३० ते सायंकाळी ५.३० वाजता एकुण ३८९ F.P.O यांचे होणार आहे.तिसरे सत्र ७ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता एकुण ६४७ O.P.O – १ यांचे होणार आहे. चौथे सत्र दुपारी १.३० ते सायंकाळी ५.३० वाजता एकुण ६४६ O.P.O २ यांचे होणार आहे.
या प्रशिक्षणा दरम्यान कर्मचा-यांनी हयगय अथवा टाळाटाळ केल्यास कारवाई करण्यात येईल असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी छत्रपतीसंभाजीनगर यांच्या वतीने कळविण्यात आले आहे. सदरील प्रशिक्षण व तयारी आढावा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी डॉ सुचिता शिदे, अतिरिक्त सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार सतिश सोनी, अतिरिक्त सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार खुलताबाद स्वरुप कंकाळ यांचे वतीने घेण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!