गंगापूर खुलताबाद मतदारसंघात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यासाठी परवानगी द्या -आमदार प्रशांत बंब.


गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर खुलताबाद मतदारसंघात गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन, खोजेवाडी, शेंदुरवादा, जामगांव व खुलताबाद तालुक्यात काटशेवरी फाटा येथे चारा छावणी सुरु करण्यासाठी परवानगी द्या आमदार प्रशांत बंब

जिल्हाधिकारी यांना आमदार प्रशांत बंब यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझ्या गंगापूर-खुलताबाद मतदारसंघामध्ये सततची नैसर्गिक आपत्ती व कोरडा दुष्काळ यामुळे नेहमी शेतकऱ्यांचे आतोनात हाल होत आहेत. याही वर्षी अशीच स्थिती निर्माण झाली असुन, शेतकऱ्यांना त्यांचे कुटूंबाबरोबर त्यांचेकडे असलेले पशुधनाचा उदरनिर्वाह करणे कठीण होत आहे.
त्यानुषंगाने या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणुन मतदारसंघात गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन, खोजेवाडी, शेंदुरवादा, जामगांव व खुलताबाद तालुक्यात काटशेवरी फाटा येथे चारा छावण्या सुरु करणे अत्यंत गरजेचे आहे.
त्या ठिकाणी चारा छावणी सुरु करणेसाठी जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर, जिल्हा कृषि अधिकारी, जि.प.छत्रपती संभाजीनगर, उपविभागीय अधिकारी, वैजापूर-कन्नड, तालुका कृषि अधिकारी, गंगापूर व खुलताबाद आणि तहसिलदार, गंगापूर व खुलताबाद यांचेकडे चारा छावणी परवानगी मिळण्यासाठी पत्र देवुन विनंती केली आहे. चार छावणी सुरू केल्यास मतदार संघातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!