गंगापूर, खुलताबाद तालुका दुष्काळग्रस्त घोषित कराआमदार सतीश चव्हाण यांची मागणी

गंगापूर (प्रतिनिधी) राज्य शासनाने नुकतेच राज्यातील काही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केलेले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर व खुलताबाद तालुक्यात दुष्काळ असूनही हे तालुके मात्र शासनाने घोषित केलेल्या यादीत नाहीत. त्यामुळे गंगापूर व खुलताबाद तालुके त्वरित दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावेत अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे .८ नोव्हेंबर रोजी केली आहे.आमदार सतीश चव्हाण यांनी यासंदर्भात आज मुंबई येथे कृषी मंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. आमदार सतीश चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गंगापूर तालुक्यात आनेवारी मध्ये ५० टक्यापेक्षा कमी आहे. तालुक्यात दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर आहे. तरीही शासनाने जाहीर केलेल्या यादीत गंगापूर तालुक्याचा समावेश झाला नसल्याने गंगापूर तालुका दुष्काळाच्या मदतीपासून वंचित राहणार आहे. गंगापूर तालुक्यात 40 टक्कक्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. पाऊस नसल्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसाळ्यात सरारी पेक्षा अत्यल्प पाऊस तथा पावसाचा खुप दिवसांचा खंड, जमिनीतील पाणी पातळीतील घट, पिक पेरा, व अपेक्षीत उत्पन्नात 50 टक्के पेक्षा अधिकची घट तथा संपूर्ण पिके वाया गेली असून जनावरांच्या चार्‍यांचा व पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी मंत्रीयांच्या निदर्शनास आणून दिले.

तसेच खुलताबाद तालुक्यात कमी पावसामुळे खरीपाची पिके हाती आली नाही. खरीप हंगामाची आनेवारी ४८ टक्के आली आहे. तरीही खुलताबाद तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेला नाही. तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी ७९९.५० मी.मी. असून या वर्षी फक्त ५३३ मी.मी.पाऊस पडला आहे. तालुक्यातील नदी, नाले, पूर्णतः कोरडे आहे. अत्यल्प पावसाने खरीप पिके वाया गेली असून रब्बी पिकाचेही काही खरे नाही. प्रशासनाने तालुक्याची आनेवारी ४८ टक्के जाहीर केली परंतु दुष्काळ जाहीर केला नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सरासरी आनेवारी 54.59 टक्के तर गंगापूर व खुलताबाद तालुक्याची आनेवारी 50 टक्यापेक्षा कमी असल्याने शासनाने त्वरित दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावेत अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!