लासूर स्टेशन येथे नववर्षानिमित्त काव्य संमेलन.

लासूर स्टेशन (प्रतिनिधी) ग़ंगापुर तालुक्यातील स्टेशन येथील शब्द सह्याद्री साहित्य प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षी नव वर्षाच्या स्वागत प्रीत्यर्थ काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते, प्रतिवर्ष प्रमाणे याहीवर्षी नववर्षाच्या स्वागतार्थ सोमवार दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे, संमेलनाचे हे सातवे वर्ष असून या पूर्वी महाराष्ट्रातील नामवंत कवी, साहित्यिक नारायण पुरी, अनंत राऊत,शरद धनगर, गेणू शिंदे, गणेश घुले, अविनाश भारती, गुंजन पाटील, धम्मापल जाधव,निलेश चव्हाण, समाधान इंगळे आदींनी संमेलनात सहभाग नोंदविला आहे तर या वर्षी नामवंत गझलकार नितीन देशमुख, एबीपी माझा फेम हास्य कवी नितीन वरणकार, प्रसिद्ध कवी प्रा संजय कावरे, कवी, निवेदक, गझलकार गोपाल मापारी यांचा सहभाग असणार आहे, या वर्षी प्रथमच झालेल्या ऑनलाईन काव्या संमेलनाचे पारितोषिक वितरण व मान्यवरांचा सहभाग असा दर्जेदार कार्यक्रम येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मैदान येथे होत असून सर्व रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजन समितीचे वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!