कांदा निर्यातीवरील ४०% कर तात्काळ रद्द करा शेतकरी कृती समितीची मागणी

कांदा निर्यातीवरील ४०% कर तात्काळ रद्द करा *शेतकरी कृती समितीची मागणी*

गंगापूर (प्रतिनिधी)कांदा निर्यातीवरील ४०% कर तात्काळ रद्द करा शेतकरी कृती समितीची शासनाकडे मागणी

शेतकरी कृती समितीच्या वतीने लासुरस्टेशन कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव के आर रनयेवले यांच्या मार्फत गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ज्ञानेश्वर निळ,इंजी.महेशभाई गुजर,अनिल (बबलू) पोळ,दिगंबर गोटे,आण्णासाहेब जाधव,किशोर गवांदे,आशुभाई शेख, विशाल गोरे यांनी केंद्रीय कृषिमंत्री व राज्य कृषी मंत्री यांना तालुक्यातील लासुरस्टेशन परिसरातील तसेच गंगापूर, खुल्ताबाद, वैजापूर, कन्नड सोयगाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतिने विनंती करण्यात येते की खरिप २०२२ साली पिकवलल्या कांद्याचा अतिवृष्टी मुळे चिखल झाला होता तेव्हा सरकारने जाहीर केलेले अनुदान मिळाले नाही रब्बी २०२२ साली कसा बसा पिकवलेला कांदा चांगला भाव मिळेल म्हणून आम्ही जपवणूक ठेवला होत्या त्या कांद्याला अपेक्षित भाव मिळेल अशी अशा असताना तुबलकी फरमान बजावून निर्यातीवर ४०% कर आकारणी करून ज्यांना २०० रूपये किलोचे टोमॅटो परवडत नाहीत त्यांना फुकटात कांदा देण्यासाठी पहीले टोमॅटो उत्पादक शेतकरी मारले आता कांदा उत्पादक शेतकरी मारायचे आहेत का?
या निवेदनाद्वारे आपणास सद्या विनंती करण्यात येते की तात्काळ कांद्या वरील ४०% निर्यात कर निर्णय रद्द करा नसता, लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलने करण्यात येतील असे निवेदन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!