विम्यापासुन वंचित ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचै जुने कायगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रात ८ जानेवारीला जलसमाधी आंदोलन


गंगापूर (प्रतिनिधी)विम्यापासुन वंचित ठेवल्यामुळे जुने कायगाव येथे ८ जानेवारी रोजी गोदावरी नदी पात्रात शेतकऱ्यांचे सामूहिक जलसमाधी आंदोलन

तहसीलदार सतीश सोनी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गंगापुर तालुक्यात या वर्षी कमी पाउस पडल्यामुळे अग्रीव पिक विम्याची बाकी तालुक्यातील मंडळामध्ये २५ टक्के रक्कम मिळाली परंतु जामगाव मंडळामध्ये अग्रीव २५ टक्के रक्कम मिळाली नाही. करिता चालु वर्षाची अग्रीव रक्कम व मागील वर्षीचे अतिवृष्टीचे अनुदान बँकेस पत्र देवून मुळ रक्कम शेतक-यांना ताबडतोब देण्यात यावी. जामगाव मंडळात जे पर्जन्यमापन (पाउस मोजण्याची मशीन) खराब आहे. ते बदलून दुसरे फिट करण्यात यावे. सन २३-२४ मध्ये खरीप विमा भरलेला असून आमचे पिकाचे पंचनामे आपल्या प्रतिनिधी मार्फत प्रत्यक्ष स्थळपंचनामा करण्यात आला असून सदर पिकाचे दोन वेळेस नुकसान झालेले असून दोन्ही वेळेस आम्ही सर्व शेतक-यांनी ऑनलाईन तक्रार करून आपल्या प्रतिनिधीने प्रतिनिधीशी प्रत्यक्ष पाहणी करून पचंनामे करूनही आम्हाला आजपर्यंत इतर शेतक-याप्रमाणे कोणतीही नुकसान भरपाई आपल्याला विमा कंपनीकडून मिळालेली नाही. शेतक-यांना बियाणे भरण्याचा खर्च सुध्दा यावर्षी निघालेला नाही. तरी आम्हा पुर्ण शेतक-यांचा आपण सहानुभुतीपुर्वक विचार करून त्वरील नुकसान भरपाई देण्यात यावी. आम्हास नुकसानभरपाई आपण न दिल्यास नाईलाजास्तव आम्ही शेतक-यांना सोबत घेवून गोदावरी नदीमध्ये सामुहिक जलसमाधी आंदोलन ०८ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहिल होणा-या परिणामास विमा कंपनी व आपण जवाबदार रहाल असे निवेदनात म्हटले आहे निवेदन देताना राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष सेवा दल भाऊसाहेब गवळी कायगावकर कायगाव विविध सोसायटी चेअरमन संजय पाटील गायकवाड ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड बापूसाहेब गायकवाड माजी सरपंच सोमनाथ पाटील गायकवाड संतोष गायकवाड बाळासाहेब भोगे रामेश्वर गायकवाड सदानंद गायकवाड अनिल नागे नारायण इष्टके अनिल गायकवाड आदी शेतकरी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!