माळीवाडगांव येथे तब्बल १५ कोटी ८५ लाख कामाचे उदघाटन.. मतदार संघातील गावा गावात विकास कामे करण्यासाठी बांधील – आमदार प्रशांत बंब.


गंगापूर (प्रतिनिधी) आमदार बंब यांच्या प्रयत्नातून माळीवाडगांव येथे तब्बल १५ कोटी ८५ लाख कामाचे उदघाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला असून सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा आजचा दिवस असल्याचे बंब यांनी सांगितले.

ज्या गोष्टींसाठी लोकप्रतिनिधींना आपण निवडून देतो त्याला साजेसे काम त्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत नागरिकांसाठी विकास कामे केले पाहिजे.
खरंतर मला आनंद होत आहे. एकाच गावात विविध गावांना जोडणारे रस्ते, वीज लाईन, फिडर, सौरऊर्जा अशा काही अलीकडील वर्षातील मंजूर व सुरू झालेल्या काही काम पूर्ण होऊन संपलेल्या तब्बल १५ कोटी ८५ लाख रुपयांच्या कामाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आज संपन्न होत असून माळीवाडगाव येथे सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा आजचा दिवस असून जनतेने माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला मी सार्थ करत आहे मतदारसंघातील गावा गावात विकास कामे करण्यासाठी बांधील असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत बंब यांनी केले.

गंगापूर तालुक्यातील माळीवाडगाव येथे विविध योजने अंतर्गत रस्ते, वीज लाईन, फिडर,लिंक लाईन, सौरऊर्जा मंजूर असलेल्या, सुरू झालेल्या व काम पूर्ण होऊन संपलेल्या कामाचे उदघाटन व लोकार्पण ४ फेब्रुवारी रविवार रोजी आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी बोलत होते.
लासुर स्टेशन ते माळीवाडगाव वैरागड, दिनवाडा, सनव
येथे नविन गावठानसाठी थ्री फेज लाईन बसवणे.
२ कोटी २० लाख रू.,
डीपीडिसी मधून लासुर ते माळीवाडगाव लिंक लाईनचे काम करणे (DPDC) ६१ लाख रु.
माळीवाडगाव – पाडळसा – डोणगाव ग्रामीण मार्ग क्रमांक १३ चे डांबरीकरण १ कोटी ३० लाख रु.
माळीवाडगाव गाव अंतर्गत ड्रेनेज लाईन बांधकामासाठी २० लाख रुपये,
माळीवाडगाव येथील सार्वजनिक स्मशानभुमीत पेवर ब्लॉक बसवण्यासाठी १० लाख रुपये,
माळीवाडगाव ग्रामपंचायत अंतर्गत जितेवस्ती पानंद रस्त्यासाठी ४४ लाख रुपये,
माळीवाडगाव – पाडळसा -किन्हळ – देऱ्हळ रस्ता तयार करणे २ कोटी ६० लाख रुपये,
माळीवाडगाव ते रायपुर प्रमुख जिल्हा मार्ग रस्ता तयार करणे ८ कोटी ६० लाख रुपये व
१५ व्या वित्त आयोगातून माळीवाडगाव ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीजवळ सौरऊर्जा मोटार बसवणे ५ लाख रुपये
अशा मंजुर झालेल्या व काही मंजूर होऊन काम पूर्ण झालेल्या तब्बल १५ कोटी ८५ लाख रुपयांच्या कामाचे उदघाटन व लोकार्पण आमदार बंब यांनी केले. यावेळी माळीवाडगाव, सनव, दिनवाडा, देऱ्हळ, किन्हळ, बाभूळगाव येथील शेकडो युवक, जेष्ठ तसेच महिलांनी भाजापात पक्ष प्रवेश केला. भाजपा जिल्हा अध्यक्ष संजय भाऊ खंबायते, तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमोल जाधव, भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष शीला गाढे, विधानसभा प्रमुख विकास कापसे, अध्यात्मिक धर्मवीर सेना जिल्हा प्रमुख कडूबाळ गवांदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेषरावनाना जाधव, कारभारी जाधव, सरपंच सुनीता कैलास दुशिंग, उपसरपंच विजय तुपे, भाजप सहकार जिल्हा अध्यक्ष मनीष पोळ, जालिंदर वाघ, बाजार समिती संचालक विलास सोनवणे, अशोक जगताप, सुरेश जाधव, सुनील पाखरे, ताहेर पटेल,
अंबर जंघाले, चिंधे पाटील, भाजप कार्यकर्ते, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेषेराव जाधव, सूत्रसंचालन कडूबाल गवांदे तर आभार विजय तुपे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!