काकासाहेब शिंदे यांना मराठा आरक्षणासाठी बलिदान देऊन पाच वर्ष पूर्ण होत आहे तरीही मराठा आरक्षणाचा तिढा कायम…आंदोलनात मराठा बांधव यांची उपस्थिती नगण्य

काकासाहेब शिंदे यांना मराठा आरक्षणासाठी बलिदान देऊन पाच वर्ष पूर्ण होत आहे तरीही मराठा आरक्षणाचा तिढा कायम.….
रास्तारोको आंदोलनात मराठा बांधव यांची उपस्थिती नगण्य होती


गंगापूर (प्रतिनिधी) हुतात्मा काकासाहेब शिंदे यांनी पाच वर्षांपूर्वी मराठा आरक्षण मिळावे यासाठी छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील कायगांव टोका येथील गोदावरी नदीच्या पात्रात पुलावरुन उडी मारुन जलसमाधी घेतली होती परंतु अद्यापही आरक्षण मिळाले नसल्याने काकासाहेब शिंदे यांच्या आई वडीलांनी शासनाने त्वरित आरक्षण द्यावे अशी कळकळीची विनंती केली आहे तर मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीने रास्तारोको आंदोलन केले.
मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी मराठा युवक काकासाहेब शिंदे यांनी जुने कायगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रात २३ जुलै २०१८ रोजी उडी घेऊन जलसमाधी घेतली होती. या घटनेला २३ जुलै रोजी पाच वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या काही समन्वयकांनी मराठा आरक्षणासाठी जुने कायगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावर सकाळी अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले यावेळी पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता या आंदोलनात रमेश केरे पाटील, किशोर शिरावत, आपा जाधव, धनंजय चिरेकर, अनिल केरे, बंडू मात्रे, शांताराम नरोटे, सांगळे ताई, विकास शिसोदे, अमोल अव्हाड, महेन्द वंजारे, भैय्या कोल्हे, अनिल सोलाट शिरवत, राजेश लांडे, यांनी अभिवादन करून सकाळी अकरा वाजता रास्तारोको आंदोलन केले या आंदोलनाकडे अनेक मराठा नेत्यांनी पाठ फिरवली आंदोलक कमी तर पोलिस जास्त दिसत होते.


अभिवादन कार्यक्रमासाठी कायगांव टोका येथील गोदावरी पुलावर हु. काकासाहेब शिंदे यांचे कुटूंबीय वडील दत्तात्रय शिंदे, भाऊ अविनाश शिंदे, आई मीराबाई शिंदे,इंद्रायणी शिंदे, आकाश शिंदे,देविदास शिंदे, दत्तप्रसाद शिंदे,अशोक पाटील यांच्यासह सर्व कूटूंबातील नातेवाईकांनी श्रदांजली वाहुन अभिवादन केले.

प्रतिक्रिया:- आज काकासाहेब यांना मराठा आरक्षणासाठी बलिदान देऊन पाच वर्ष पूर्ण होत आहे तरीही मराठा आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही. अजूनही समाज न्यायाच्या प्रतीक्षेतच आहे. आज पुन्हा एकदा समाज ओबीसी मधूनच 50 टक्क्याच्या आतीलच आरक्षण पाहिजे ही मागणी करताना दिसत आहे कारण ते टिकाऊ आरक्षण असेल. ते आरक्षण लवकरात लवकर मिळावे.
भाऊ अविनाश शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!