सिद्धनाथ वाडगाव येथे वीज पडून बैलाचा मृत्यू

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथे शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट झालेल्या पावसाने वीज पडून गट नंबर 47 मध्ये किशोर वाघ यांचे बैल बांधलेले होते त्यातील एका बैलावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला सिद्धनाथ वाडगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चौधरी, तलाठी जानी शेख, ग्रामसेवक अकबर शेख यांनी प्रत्यक्ष घटनेचा जागेवर जाऊन पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी पुढील कार्यवाही केली यावेळी आपत्ती ग्रस्त शेतकरी किशोर वाघ,प्रमोद महाजन, मच्छिन्द्र वाघ, भगवान वाघ,प्रवीण वाघ, नानासाहेब नरोडे,कैलास वाघ, विठ्ठल वाघ, विष्णू वाघ, योगेश वाघ, भावेश वाघ संभाजी शिंदे,सूरज राजपूत,प्रदीप गवारे,गणेश मरमट आदी उपस्थित होते, अगोदर पावसाने कांदा, गहू सारख्या पिकांचे नुकसान झाले त्यात पुन्हा या अवकाळी पावसाने झालेले नुकसान आपत्ती ग्रस्त शेतकऱ्याचे बैल वीज पडून मृत्यमुखी झाल्याने 40 ते 45 हजार रुपयांचे नुकसान झाले असून झालेल्या नुकसानाची भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्याला द्यावी अशी मागणी प्रमोद महाजन यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!