जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत धूत कन्या विद्यालयाची पूजा द्वितीय

गंगापूर(मयुर बन्सोड)मुख्यमंत्री समृध्दी चषक जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतगंगापूरच्या धूत कन्या विद्यालयाच्या पूजा मोहितेला दुसरे पारितोषिकपंधरा हजार रोख व स्मृतीचिन्ह देउन गौरव…
महाराष्ट्र शासनाच्या राज्य रस्ते विकास महामंडळ व माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मुख्यमंत्री समृध्दी चषक निबंध स्पर्धेत गंगापूर येथील राजाबाई धूत कन्या कनिष्ट महाविद्यालयाच्या ११ वी विज्ञान शाखेची विद्यार्थीनी कु. पूजा ध्रुव मोहिते हिने उपविजेतेपद पटकावले आहे.
ही स्पर्धा संपूर्ण जिल्ह्यातील शाळा व कनिष्ट महाविद्यालयांमध्ये दि. ८ व ९ जानेवारी २३ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कु. पूजा ध्रुव मोहिते हिने ‘रस्त्यांचा विकास आणी प्रगती’ या विषयावर निबंध लिहून हे उपविजेतेपद पटकावले आहे.
तिच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता आर.टी. खलसे व शिक्षणाधिकारी माध्यमिक मधुकर देशसमुख यांच्या सहीने पूजाला पंधरा हजार रूपयांचा धनादेश व प्रमाणपत्र देउन तिचा गौरव करण्यात आला. तिच्या या यशाबद्दल शाळेचे संस्थापक मा.खा. राजकुमारजी धूत, अक्षयकुमारजी धूत, शालेय समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार मंत्री, तृप्ती मंत्री, प्राचार्या संजीवनी बेंद्रे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!