पतीला जिवे मारून पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावले

पतीला जिवे मारून पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पत्नीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या तिघांच्या गंगापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या ही घटना १ व २ एप्रिल च्या मध्यरात्री सिरजगाव शिवारात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील कोबापूर येथील शेतकरी संतोष हरिचंद चांदवडे ४० हे कुटुंबासह शिरजगाव शिवारातील गट नंबर १४ मध्ये राहत होते त्याच्या पत्नीला गेल्या दोन वर्षांपासून रायभान थोरात हा पती व दोन्ही मुलींना जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार करत होता एक एप्रिल ते दोन एप्रिल च्या मध्यरात्री शेजारी राहणारे  रायभान काशिनाथ थोरात हा  संतोषच्या घरी आला व कडी वाजवुन म्हणाला की मला तुझ्या बायकोला करायचे आहे तु दार उघड संतोषने दार उघडून रायभानच्या कानामागे मारली असता रायभान याने लोखंडी पहार घेऊन संतोषला मारली त्यावेळी राहुल आघाडे, अनिल शिरसाट या तिघांनी संतोषला लोखंडी पहार व काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली तो गंभीर जखमी झाल्यानंतर शेजारी असलेल्या कोरड्या विहिरीमध्ये  ढकलण्यात आले पत्नीने विनवणी केल्यावर आरोपींनी अर्ध्या तासानंतर त्याला वरती काढून जीव जाईपर्यंत मारहाण करण्यात आली त्याचा जीव गेल्यानंतर रायभान काशीनाथ थोरात, राहुल मच्छिद्र आघाडे व अनिल विठ्ठल शिरसाठ या तिघांनी मिळून संतोष हरिश्चंद्र चरावंडे यास लोखंडी पहार व काट्यांनी मारहाण करून विहीरीत फेकुन जीवे ठार मारून फिर्यादी व फिर्यादीच्या मुलींना कुणाला काहीही सांगीतले तर तुम्हाला सुद्धा खतम करू अशी धमकी देवून फिर्यादीच्या कानातील व गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने काढून घेतले. आरोपींच्या जीवे मारण्याच्या धमकी मुळे फिर्यादी व फिर्यादीच्या मुलींनी कुणालाही खरी घटना सांगीतली नाही.
गंगापुर पोलीसांना सदर घटनेची कुणकुण लागताच . पोलीस अधीक्षक  मनिष कलवानिया,  अपर पोलीस अधीक्षक  सुनिल लांजेवार,  उपविभागीय अधिकारी  प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापुर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी  साईनाथ गिते, पोउपनि  दिपक औटे, पोहेकॉ कैलास निभोंरकर, विजय नागरे, अमित पाटील, पोअं अभिजित डहाळे, पदमकुमार जाधव, विक्रम सुंदर्डे, बलवीर बहुरे यांनी गुन्हा उघडकीस आणून आरोपीचा शोध घेवून ) रायभान काशीनाथ थोरात वय 43 वर्षे, 2) राहुल मच्छिद्र आघाडे वय 31 वर्षे, (3) अनिल विठ्ठल शिरसाट वय 26 वर्षे सर्व रा. सिरगाव ता. गंगापुर जि. औरंगाबाद यांना गुन्ह्यात अटक केलेली असून, आरोपीविरुद्ध खून, पुरावा नष्ट करणे, वारंवार बलात्कार करणे, जबरी चोरी या कलमांर्तगत गुन्हा दाखल केलेला असून, गुन्ह्याचा तपास सपोनि श्री साईनाथ गिते, पोहेकॉ केलास निंभोरकर, विजय नागरे हे करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!