लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर माध्यमिक विद्यालयाचा मुंबई येथे सन्मान

गंगापूर (प्रतिनिधी)
एबीपी माझा, gyan-key वाचनालय व asymmetric
यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अमृतमोहत्सवी स्वतंत्र भारत’ या उपक्रमात स्वातंत्र्यांची ७५ वर्षे व पुढील २५ वर्षे या विषयावर आयोजित अभिनव निबंध स्पर्धेत लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर उच्च माध्यमिक विद्यालय रांजणगाव पोळ शाळेच्या उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मुंबई येथील वाय बी चव्हाण सेंट्रल हॉल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यालयाचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ५००० माध्यमिक शाळा सहभागी झाल्या होत्या.या शाळेतील ७६००० विद्यार्थ्यांनी यात निबंध सादर केले.यातुन निवडक १० शाळा निवडण्यात आल्या होत्या.त्यामध्ये रांजणगाव पोळ विद्यालयाची निवड झाली.
Gyan-key- वाचनालय ही सेवाभावी संस्था भारतातील ‘पोस्टकार्ड मॅन’ ओळखले जाणारे प्रदीप लोखंडे यांनी ग्रामीण भागातील ५००० शाळेत वाचनालय सुरु करुन वाचन चळवळ सुरु केली. १८००० पेक्षा अधिक संगणक विद्यार्थ्यांना पुरवणारी ही संस्था आहे.
मुंबई येथे Gyan key आणि ABP वृत्त वाहिनीच्या वतीने यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृह (Y.B.Center) मुंबई येथे ११ ऑगस्ट रोजीआयोजित समारंभामध्ये शाळेचा विद्यार्थी संदीप सुभाष गायकवाड मार्गदर्शक शिक्षक संतोष मल्लनाथ आणि सहशिक्षक रामेश्वर शेळके यांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला.या सन्मान सोहळ्यास ABP माझा चे मुख्य संपादक राजीव खांडेकर प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक केदार शिंदे अभिनेत्री वंदना गुप्ते,जितेन्द्र जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत डोणगावकर शाळेतील तीनशे पन्नास विद्यार्थ्यांनी अमृतमहोत्सवी स्वतंत्र भारत व पुढील २५वर्षे या विषयावर अतिशय प्रभावी विचार पोस्टकार्डवर लिहीले त्यामुळेच महाराष्ट्रातुन पाच हजार शाळेतुन पुरस्कारासाठी डोणगावकर विद्यालयाची निवड करण्यात आली होती.

या निवडीबद्दल संस्थेच्या अध्यक्षा इंदुमतीताई डोणगावकर, मार्गदर्शक कृष्णा पाटील, सचिव देवयानीताई डोणगावकर, शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर थोरात, शालेय समिती अध्यक्ष शिवाजी बोडखे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संदीप गायकवाड यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!