महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र रामेश्वर व सिद्धेश्वरला लाखो भाविकांची मांदियाळी.हर हर महादेवच्या गजराने दुमदुमले मंदिर विद्युत रोषणाईने परीसर उजळून निघाला

गंगापुर(प्रतिनिधी)महाशिवरात्रीच्या निमित्ताने तालुक्यातील श्रीक्षेत्र रामेश्वर, संकटेश्वर व नेवासा तालुक्यातील टोका येथील गोदावरी नदीच्या तीरावर असलेल्या या मंदिरात भाविकांनी पहाटे पासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती.दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले.”हर हर महादेव”च्या गजराने सर्व मंदिरे दुमदुमले होते.

महाशिवरात्री निमित्ताने टोका येथील श्री रामेश्वर व श्री सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात मोठी यात्रा भरली होती.विविध दुकाने यात्रेत थाटण्यात आली होती या परिसरात गोदावरीत नदीचे पाणी खोल गेल्याने असल्याने भाविकांना स्नान करण्यासाठी नदीच्या पात्रात जावुन स्नान करावे लागले .पुरातन महिमा व प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य झालेल्या या पवित्र क्षेत्राच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने आले होते यावेळी सिद्धेश्वर मंदिराचे प्रमुख बालयोगी परमानंद महेश्वरांनद महाराजांनी आलेल्या हजारो भाविकांचे हसत मुखाने स्वागत करून त्यांना शुभाशीर्वाद दिले.

शिवभक्तांनी स्वयंसेवकाची भूमिका बजावून भाविकांना सेवा दिली.

श्री रामेश्वर मंदिर व सिद्धेश्वर मंदिर परिसरात मोठी यात्रा भरल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप भागवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता यामध्ये पोलीस व होमगार्ड बांधवांसह तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देखील सेवा देण्यासाठी मोठी भूमिका बजावली.पहाटे पासून ते रात्री पर्यंत दर्शनासाठी गर्दीचा ओघ येथे सुरूच होता दिवसभरात लाखो भाविकांनी महाशिवरात्री  निमित्त भगवान श्री रामेश्वर व श्री सिद्धेश्वराचे दर्शन घेतले.

 

संस्थांनकडून लाइव्ह कॅमेऱ्याच्या साह्याने एलसीडीद्वारे दर्शनाचीही व्यवस्था करण्यातआली असून मंदिर व परिसरात सीसीटीव्ही ड्रोन कॅमेरे लाइव्ह सुरू होते.

यात्रेत प्राथमिक आरोग्य केंद्र भेंडाळा च्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आणि आशा स्वयंसेविकांनी चोख आरोग्य सेवा बजावली.या प्रसंगी
रक्तदान शिबीर ही घेण्यात आले.
यात्रेत लहान मुलांची खेळणी,रसवंतीगृह ,रहाटपाळणे,भांड्याच्या दुकानी, खाऊच्या दुकानी आदी वस्तूंच्या दुकानी थाटल्या होत्या.पहाटे पासून रात्री उशिरा पर्यंत शिवालय च्या दर्शनासाठी भाविकांची वर्दळ सुरूच होती.
यात्राउत्सव यशस्वीतेसाठी जुने कायगाव येथील श्री रामेश्वर मंदिर देवस्थान समिती, ग्रामपंचायत तसेच समस्त गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!