अगरकानडगांवच्या सेवानिवृत्त चव्हाण या सैनिकाचे ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत.


गंगापूर (प्रतिनिधी) भारतीय सैन्यदलातुन सेवानिवृत्त होवून घरी परतणाऱ्या बाबासाहेब चव्हाण ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढुन ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

गंगापूर तालुक्यातील अगर कानडगा चे सुपुत्र बाबासाहेब शांतवन चव्हाण हे ८ फेब्रुवारी २००० रोजी. भारतीय सैन्यदलात ७ महार रेजिमेंट मध्ये भरती झाले होते ते २९ फेब्रुवारी २०२४ रोजी जम्मू काश्मीर येथून सेवा निवृत्त झाले . त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सेवा गौरव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती संभाजीनगर येथे आगमन झाल्यावर एस क्लब येथे अण्णासाहेब बर्फे परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले.
त्यानंतर वाळुज महानगर एक येथील विजयालक्ष्मी हाउसिंग सोसायटी यांच्या वतीने अनिल वाघ यांच्या हस्ते बाबासाहेब चव्हाण व पत्नी अर्चना बाबासाहेब चव्हाण यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
गंगापूर शहरात आगमन झाल्यानंतर लासुर नाका येथे सर्व शिक्षकांच्या व धम्म संस्कार समिती गंगापूर तालुका यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर गंगापूर तालुका वकील संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक गंगापूर येथे स्वागत करण्यात आले. व नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
जामगाव येथे भारत तुपलोंढे ,संदीप साळवे व जामगाव ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ममदापूर येथे सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत आणि आबासाहेब रणपिसे मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अगरकानडगाव फाटा येथे आगमन झाल्यानंतर माध्यमिक विद्यालय कानडगाव यांच्या वतीने शिक्षक पडघन व सर्व सहकारी शिक्षकांनी स्वागत केले. कानडगाव ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच इसाक पटेल.यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी फटाक्यांची अतिषबाजी करून ग्रामस्थांनी बाबासाहेब चव्हाण यांचे जल्लोषात स्वागत केले.
अगर कानडगाव येथे सभास्थळी उपस्थित झाल्यानंतर आई, वडील, भाऊ, बहिणी, आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी न्यायाधीश शंकर दाभाडे, सुनील मगरे नितीन जाधव,खलील पटेल,राजू पटेल,कलीम पठाण, अनिल कांबळे. इरफान पटेल.सलीमभाई पठाण.लोकमत पत्रकार, कादिर पटेल. देविदास शिंदे.त्रिदल सैनिक सेवा संघ श्रीरामपूर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!