कौतुकास्पद.महीला दिनी गंगापूरच्या धाडसी आजीने मंगळसूत्र चोरणाऱ्या महीलेचा पाठलाग करत मंगळसूत्र मिळविले


गंगापूर (प्रतिनिधी) महीला दिनी गंगापूर येथील पंचाहत्तर वर्षीय आजीचे मंगळसूत्र वाळुज येथे बसमध्ये बसत असताना सहप्रवासी महिलेने मंगळसूत्र हिसकावून पळाली असता आजीने पाठलाग करुन महिलेला पकडून मनी मंगळसुत्र हस्तगत केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

गंगापूर येथील पंचाहत्तर वर्षीय झुंबरबाई पाटील यांनी तरुणाईला लाजवेल असा पराक्रम केला असून त्या वाळूज येथे मुलगी व जावई यांच्या कडे आल्या होत्या. परत गंगापूरला जाण्यासाठी पोलीस ठाण्या जवळच्या बस स्थानकावर गंगापूरची बस पकडुन त्यात बसत असताना सहप्रवासी बनून पाठीमागून येत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र एका अनोळखी महिलेने लंपास केले होते. त्यावेळी त्यांनी तत्परता दाखवली व भर रस्त्यावर तिचा पाठलाग करत तीला पकडले व पाच ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. ही घटना वाळूज ठाण्याच्या समोरच शुक्रवारी ८ मार्च रोजी महीला दिनी दुपारी तीन वाजता घडली आहे. मात्र वाळूज पोलिसांना याप्रकरणी कोणतीही माहिती नसल्याचे येथील पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!