गंगापूरात महेश नवमी उत्साहात…

गंगापूरात महेश नवमी उत्साहात साजरी

रक्तदान शिबिरात रक्त दात्यांनी रक्तदान केले.

गंगापूर शहरात महेश नवमी निमित्ताने समाज बांधव व महेश युथ क्लबच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गंगापूर शहरात सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी महाआरती चे मुख्य यजमान जगदीश सारडा, सपना सारडा यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले;
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली यानंतर उपस्थितांना फोटो फ्रेम वाटप करण्यात आले. नवमी निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात रक्त दात्यांनी रक्तदान केले. यावेळी महेश युथ क्लबचे सर्व सदस्य व समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते. याप्रसंगी
रामकिसन धूत, माजी साखर कारखाना संचालक रामेश्वर मुंदडा, श्यामसुंदर धूत, महेश नावंदर, अशोक रमेशचन्द्र नावंदर, बद्रीकिशोर सोमानी, विजयकुमार सोमानी ,सोमनाथ तोतला, नंदलाल नावंदर ,गणेश नावंदर, महेश नावंदर, राजेश बजाज , महेश्वरी अध्यक्ष रत्ना लाहोटी, उपाध्यक्ष प्रेमा मालपाणी, रमेश तापडिया, अतुल सोमानी, भरत सोमानी, सुमित सोमानी, उमेश नावंदर रितेश लावणी श्रीराम नावंदर, महेश मुंदडा, विशाल लड्डू, निलेश बजाज, मंगेश मालपाणी, ओमप्रकाश मालपाणी, अभिजीत तापडिया, यांच्यासह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!