श्री मुक्तानंद महाविद्यालय गंगापूरला नॅक च्या चौथ्या मूल्यांकनास ए डबल प्लस(A++) दर्जा, ग्रामीण भागातून प्रथम येण्याचा मान.

गंगापूर (प्रतिनिधी)
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात संचलित श्री मुक्तानंद महाविद्यालय गंगापूरला नॅकच्या चौथ्या मूल्यांकनात A++ दर्जा प्राप्त झाला आहे. महाविद्यालयाने ३.५६ गुण घेऊन महाराष्ट्रातून ग्रामीण भागातील प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
महाविद्यालयाच्या चौथ्या पुनर्वल्यांकनासाठी 26 व 27 एप्रिल रोजी नॅक बंगलोर च्या वतीने तीन सदस्य समितीने महाविद्यालयास भेट दिली होती. यावेळेस नवीन फॉरमॅट नुसार महाविद्यालय नॅकला सामोरे गेले. यासाठी नॅक बंगलोर यांच्या वतीने समितीचे चेअरमन म्हणून मा.डॉ गोपाळ कुमार नरौला क्शेत्री, माजी कुलगुरु सिक्कीम विद्यापीठ , गंगटोक, हे होते तर सदर समितीचे समन्वयक व सदस्य म्हणून डॉ.टी के नाईक , रायलसीमा विद्यापीठ, कुरनूल आंध्रप्रदेश आणि तिसरे सदस्य म्हणून डॉ बाबू थारीत, प्राचार्य , ख्रिश्चन अकादमी ऑफ़ अडवान्सड स्टडीज् बेंगलोर हे होते .
प्रथम महाविद्यालयाच्या वतीने प्रवेशव्दाराजवळ समितीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थिंनीनी लेझीमच्या तालात महाविद्यालयाच्या आतील प्रवेशव्दाराजवळ महाराष्ट्रीयन पध्दतीने औक्षंण करुन व फेटे बांधून शाल व पुष्पगुच्छ देऊन रितसर स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सरस्वती माता, श्री मुक्तानंद स्वामी व म.शि.प्र.मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.विनायकराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन व दिप प्रज्वलन मानवरांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्या प्रोफेसर डॉ. सी.एस.पाटील यांनी पूर्ण महाविद्यालयाचे सादरीकरण केले. त्यानंतर सदर समितीने महाविद्यालयातील विज्ञान विभाग, वाणिज्य विभाग, सामाजिकशास्त्रे विभाग तसेच ग्रंथालय, औषधी वनस्पती उद्यान, वर्मी कपोस्ट प्रकल्प, क्रीडा विभाग, कार्यालय, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, एम.पी.एस.सी. मार्गदर्शन सेल इ. विभागांना भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर महाविद्यालयाची प्रशासकीय कार्यप्रणाली , अंतर्गत मुल्याकंन व गुणवत्ता निर्धारण कक्षाची कार्यप्रणाली, उत्तोमोउत्तम लोकाभिमुख,, समाजाभिमुख उपक्रम याचा आढावा घेण्यात आला. यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सी.एस.पाटील व महाविद्यालयाचे नॅक समन्वयक डॉ विवेकानंद बी जाधव यांनी आपले सादरीकरण करून महाविद्यालयाचा विविध उपक्रमाचे सादरीकरण केले.यानंतर दि. 26 एप्रिल रोजी दु. 2. वाजता माजी विद्यार्थी, पालक, आजी विद्यार्थी यांच्याशी बैठक घेतली. दि.26 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी सांस्कृतिक विभागाच्या वतीने समिती समोर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला तो छान झाला. 27 एप्रिल 2023 रोजी समितीने महाविद्यालयातील उर्वरित विभागांना भेटी दिल्या. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता महाविद्यालयाच्या प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी यांच्या सोबत नॅक समितीने एक्झीट मिटींग घेऊन महाविद्यालयाच्या नॅक पुनर्मूल्यांकनाबाबतचा अहवाल बंद पाकीटात प्राचार्या डॉ. सी.एस.पाटील यांचेकडे सादर केला. या प्रसंगी समितीचे चेअरमन .डॉ गोपाळ कुमार नरौला क्शेत्री यांनी आपल्या भाषणात महाविद्यालयाच्या प्रगतीबाबत अभिनंदन करुन आपली भेट यशस्वी झाल्याचे नमूद केले. नॅकच्या या दोन दिवसीय भेटीस म.शि.प्र.मंडळाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य त्रिंबकराव पाथ्रीकर, माजी आमदार लक्ष्मणराव मनाळ यांची उपस्थिती होती.
या समितीने आपला रिपोर्ट कार्यालय बंगलोर येथे सादर केला होता यानंतर दिनांक 1 मे 2023 रोजी महाविद्यालयाच्या नॅक चौथ्या मूल्यांकनाचा निकाल घोषित झाला या निकालात महाविद्यालयाने CDGA 3.56 गुण प्राप्त करत A++ दर्जा मिळून ग्रामीण भागातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. या यशाबद्दल या यशाबद्दल महाविद्यालयात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला डीजे व फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला विजेच्या तालावर सर्व प्राचार्य प्राचार्य प्राध्यापक विद्यार्थ्यांनी तालात नाचून आनंद साजरा केला.
महाविद्यालयाच्या यशाबद्दल मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश दादा सोळंके, सरचिटणीस आमदार सतिशभाऊ चव्हाण व मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्य, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. याप्रसंगी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य माजी आमदार ॲड. लक्ष्मणराव मनाळ ,संजय जाधव इकबाल सिद्दिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य सी एस पाटील, नॅक समन्वयक डॉ.विवेकानंद जाधव, उपप्राचार्य डॉ.वैशाली बागुल, उपप्राचार्य डॉ
बी. टी.पवार, उपप्राचार्य प्रा.विशाल साबणे, प्रबंधक भास्कर सुरवसे, बळवंत बिरादार ,महेश बिरादार, डॉ.नितेश बिरादार तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व सर्व प्रशासकीय कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!