घाव सहन केल्याने दगडही देव झाला – प्रकाशनंदगीरी महाराज

घाव सहन केल्याने दगडही देव झाला – प्रकाशनंदगीरी महाराज…. टेंभापुरी येथे विठ्ठल रखुमाई मुर्तीची प्रतिष्ठापना संपन्न

गंगापूर (प्रतिनिधी): दगडाच्या मुर्तीवर विधीवत पुजन करुन व ब्रम्हवंदाच्या मंत्रघोषाने घाव सहन केलेल्या दगडाचे रुपांतर देवात झाले, म्हणून जिवनात घाव सहन करायला शिका असे प्रतीपादन देवगड संस्थानचे स्वामीजी प्रकाशनंदगीरी महाराज यांनी गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी येथे प्राणप्रतिष्ठा दरम्यान काल्याच्या कीर्तनात केले.


ब्रम्हलिन संत सद्गुरू श्री किसनगिरीजी महाराज, तथा दत्तगीरिजी महाराज, ब्रम्हलिन संत श्री सहदेवजी महाराज आसेगावकर, ब्रम्हलिन संत श्री श्याम गिरिजी महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने व सद्गुरू भास्करगिरिजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान यांच्या मार्गदर्शनाने गंगापूर तालुक्यातील टेंभापूरी येथे विठ्ठल रुक्मिणी मुर्तीची त्रिदीनी श्री विठ्ठल रखमुई मुर्ती प्राण्रप्रतिष्ठा झाली.


गुरुधानोरा येथील वेदशास्त्र संपन्न बालुगुरु जोशी (लिंबेजळगावकर) यांच्या पौराहीत्याखाली दीपक जोशी गुरुजी, वेदमूर्ती सतीश खोचे गुरुजी, वेदांताचार्य गणेश जोशी गुरुजी, ज्योतीषी लक्ष्मण जोशी गुरुजी यांच्या वेद वाणीतुन मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाली.याप्रसंगी ह.भ. प.महंत कैलासगीरिजी महाराज, भ.प.विट्ठल महाराज शास्त्री पिंपरखेडा, ह.भ. प.विष्णुपंत महाराज नेमाने, ह.भ. प विजय महाराज खेडकर सप्तश्रृंगी आश्रम लिंबेजळगाव, आदि संत मंहताची उपस्थिती राहील.
मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वा. गुरुवर्य ह.भ.प. श्री स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठापन व पूर्णाहुती झाली. प्राणप्रतिष्ठा सोहळा रोजी सकाळी आठ वाजता दिंडी प्रदक्षिणा झाली व नंतर स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान यांचे हरिकिर्तना नंतर माहप्रसाद वाटप करण्यात आला.
यावेळी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकांची मोठी उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी गावातील तरुणांनी विशेष पुढाकार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!