धनगर आरक्षणासाठी बसलेले उपोषणार्थी संपत रोडगे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बसलेले उपोषणार्थी संपत रोडगे यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये प्रशासनाच्या वतीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजी नगर येथील कोकणवाडी येथे धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी गेल्या सात दिवसापासून धनगर समाजाच्या वतीने संपतं रोडगे, हरिचंद्र वैद्य,रंगनाथ राठोड हे समाज बांधव आमरण उपोषणाला बसले आहे
उपोषण करते संपत रोडगे यांची प्रकृती २५ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता खराब झाल्यामुळे डॉक्टरांनी तपासून दवाखान्यात दाखल करण्याच्या सूचना दिल्यामुळे वेदांत नगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व शासकीय टीमने रोडगे यांना शहरातील शासकीय रुग्णालय येथे आणून उपचार सुरू केले आहे आता त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचार सुरू आहे.परंतु कुठलेही ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत रोडगे उपोषणावर ठाम असल्याचे मत रोडगे यांनी व्यक्त केले. उपोषणस्थळी आमदार प्रशांत बंब, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन किरण पाटील डोणगावकर, आमदार सतीश चव्हाण यांच्यासह दादासाहेब रोडगे, गणेश तागड, प्रकाश रोडगे, आप्पासाहेब तागड, ठवाळ आदींसह समाज बांधवांनी भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!