दहावी बोर्ड परीक्षेत सावित्रीच्या लेकीच ठरल्या सरस- अमृता शिवाजी बोडखे ९६ टक्के गुण मिळविले

दहावी बोर्ड परीक्षेत सावित्रीच्या लेकीच ठरल्या सरस- अमृता शिवाजी बोडखे ९६ टक्के गुण मिळविले
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल शुक्रवार २ जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाच्या वतीने नऊ विभागामध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. अपेक्षेप्रमाणे याही वर्षी दहावी बोर्ड परीक्षेत वाळूज महानगरात मुलींनीच बाजी मारली आहे. राजा शिवाजी माध्यमिक विद्यालय बजाजनगर येथील राजा शिवाजी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन करत विद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली. महाविद्यालयाच्या ९५ टक्के निकाल लागला असून यामध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. यामध्ये काजल ज्ञानेश्वर शिनगारे ९७ टक्के गुण मिळवत प्रथम, अमृता शिवाजी बोडखे ९६ टक्के गुण मिळवून दुतीय, तर वैष्णवी तातेराव आव्हाळे ९३.८० टक्के गुण मिळवून तृतीय तसेच अक्षय विजय कोंकटवार याने ९३.४० टक्के गुण मिळवत महाविद्यालयातून चतुर्थ क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तसेच विद्यालयाचे डिस्टेन्शन मध्ये ८७ प्रथम श्रेणी मध्ये ५७ द्वितीय श्रेणी मध्ये ३३ विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणी मध्ये तर ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव एकनाथराव जाधव, सहसचिव अमन जाधव, मुख्याध्यापिका विमल जाधव, प्राथमिकचे मुख्याध्यापक के.पी.घायवट, इलियास पठाण, राजन सोमासे, डब्ल्यू जे गायकवाड,बी जी गायकवाड, सी के जाधव,गोरख पगार, डी टी जारवाल, यु आर डावखर,एस डी वैष्णव, कैलास बारगळ,पी आर राजे, आर एच निकम आदींनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!