आठ हजारांची लाच घेताना गंगापूर तालुक्यातील मांलुंजा खुर्दच्या ग्रामसेवकांला रंगेहाथ पकडले

आठ हजारांची लाच घेताना मांलुंजा खुर्दच्या ग्रामसेवकांला रंगेहाथ पकडले

गंगापूर (प्रतिनिधी) मंजूर घरकुलात कोणतीही त्रुटी न काढण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना मांलुंजा खुर्दच्या ग्रामसेवकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील २७ वर्षीय तक्रारदार हे गंगापूर तालुक्यातील मालुंजा (खुर्द) येथील रहिवासी असून त्यांच्या वडिलांचे नावाने रमाई आवास योजना अंतर्गत घरकुल मंजुरीमध्ये कोणतीही त्रुटी न काढता सदरची फाईल पंचायत समिती गंगापूर येथे मंजुरीकरिता पाठविण्यासाठी ग्रामसेवक दिलीप गमजू गायकवाड, वय ४३ वर्ष, यांनी पंच साक्षीदार यांच्या समक्ष १८ सप्टेंबर रोजी १० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती ८ हजार रुपये रक्कम स्विकारण्याची कबुल केले होते तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्याकडे तक्रार केली असता तक्रारीत तथ्य आढळल्याने २० सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे सापळा लावला असता ग्रामसेवक गायकवाड यांनी ८ हजार रुपये स्वीकारले असता लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे ,पोना साईनाथ तोडकर, पोअ केवलसिंग घुसिंगे, चांगदेव बागुल यांनी गायकवाड यांना लाचस्विकारताच ताब्यात घेतले असून पो स्टे क्रांती चौक येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे पोलिस उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे ,पोना साईनाथ तोडकर, पोअ केवलसिंग घुसिंगे, चांगदेव बागुल यांनी केली

भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास* *टोल फ्री क्र:-१०६४ मा.पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजीनगर ९९२३०२ 9923023361 संपर्क साधावा असे आवाहन*करण्यात आले आहे.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!