छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावरील ढोरेगांव येथे गतीरोधक व सिंग्नल त्वरित बसवा -आमदार प्रशांत बंब


  1. गंगापूर (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावरील ढोरेगांव येथे झेब्रा क्रॉसिंग ब्रेकर,(गतीरोधक) प्लास्टिकचे ब्रेकर तसेच बिलीकर लाईट (सिग्नल) ट्राफिक सिग्नल तात्काळ बसविण्यासाठी आमदार प्रशांत बंब यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे.
    राज्य परिवहन महामंडळाच्या प्रादेशिक परिवहन अधीका-यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की गंगापूर खुलताबाद मतदारसंघातून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावरील ढोरेगांवात वळणाऱ्या महामार्गावर रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरु असते.ढोरेगांव या ठिकाणी माध्यमिक कॉलेज असुन, मोठ्या प्रमाणावर परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरम्यान ७ फेब्रुवारी रोजी या कॉलेजमधून घरी जातांना रस्ता ओलांडत असतांना भरधाव बसने धडक मारल्यामुळे, एका विद्यार्थ्यांचा जागेवर मृत्यू होऊन, दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते
    या ठिकाणी वाहतुकीची वर्दळ जास्त असल्यामुळे वेगवेगळ्या मार्गाने जाणाऱ्या वाहनांना कुठेही बंधन नसल्यामुळे ढोरेगावाकडे वळणाऱ्या ठिकाणी छोटे-मोठे अपघात वारंवार होत आहेत. अपघाताचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे या ठिकाणचा वाहनांचा वेग कमी करण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग(गतीरोधक) ब्रेकर, प्लास्टिकचे ब्रेकर तसेच विलीकर लाईट (सिग्नल) ट्राफिस सिग्नल बसविणे अत्यंत गरजेचे असून, त्यासाठी स्थानिक नागरिकांची प्रचंड मागणी होत आहे
    भविष्यात याठिकाणावरील अपघात टाळण्यासाठी व वाहनांचे स्पीड कंट्रोल करण्यासाठी ढोरेगावकडे वळणाऱ्या ठिकाणी सिग्नल व इतर ब्रेकर बसविणेसाठीची तात्काळ कार्यवाही करुन, केलेल्या कार्यवाहीबाबत उलटटपालली माहिती पाठवा असे पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!