वैयक्तिक गायन स्पर्धेत समर्थ शिंदे प्रथम तर समुह नृत्य स्पर्धेत धुत कन्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला 

गंगापूर (प्रतिनिधी) मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवगिरी ग्लोबल अकॅडमी यांच्या वतीने आयोजित वैयक्तिक गायन व समूह नृत्य स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
गंगापूर येथे आमदार सतीश चव्हाण यांच्या वाढदिसानिमित्त शहरामधील माध्यमिक, व उच्च्य माध्यमिक स्थरावरील विद्यार्थांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी वैयक्तिक गायन व समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, त्या स्पर्धेमध्ये गंगापूर परिसरामधील विविध शाळेने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. वैयक्तिक गायन या प्रकारात समर्थ शिंदे याने प्रथम, कृष्णराज काळे द्वितीय व गुंजन पगारे हीने तृतीय क्रमांक पटकावला, तर समूह नृत्य या प्रकारामध्ये धूत कन्या प्रशाला, गंगापूर या शाळेने प्रथम, जिल्हा परिषद, वरखेड यांनी द्वितीय व न्यू हायस्कूल, गंगापूर या शाळेने तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेचे परीक्षण प्रा.अभिजित गायकवाड व प्रा.कृष्णा गवारे यांनी केले. बक्षीस वितरण गंगापूर शहराचे माजी नगरअध्यक्ष खालेद नहादी, स्थानिक शालेय विकास समिती अध्यक्ष सुधीर माने, शालेय समिती सदस्य सोपान देशमुख व प्राचार्य, मनेश राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमसेन कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन क्रांतीसिंग राजपूत यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!