जीवनदुत गौरव पुरस्काराने गंगापूरचे सागर शेजवळ सन्मानीत


गंगापूर (प्रतिनिधी) रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ यांना छत्रपती संभाजीनगर येथे जीवनदुत गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
गेल्या वर्षभरात रस्ता अपघातात अनेक जखमींना जीवनदान दिल्याने व जीवनदुत म्हणून उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल रुग्णवाहीका चालक सागर शेजवळ यांचा छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांच्याहस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला. यावेळी डिन सुहास रहाणे, वाहतूक शाखेचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत डीसले, विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर , उपसंचालक धिरज शिरोडकर , सहा. मोटार वाहन निरीक्षक योगेश सापिके, आरटीओ मनिष दौंड, सविता पवार आंदीची प्रमुख उपस्थिती होती.मिळालेल्या पुरस्कारामुळे शेजवळ यांचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!