आमदार सतीश चव्हाण यांच्यावतीने गरजू नागरिकांना निर्धूर चुलीचे वाटप 

आमदार सतीश चव्हाण यांच्यावतीने गरजू नागरिकांना निर्धूर चुलीचे वाटप

आयआय केअर फाउंडेशन व भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

गंगापूर(प्रतिनिधी)- आयआय केअर फाउंडेशन, मुंबई व भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूर शहरातील गोर-गरीब गरजू नागरिकांना१२ जुन रोजी निर्धूर चुलीचे (Cookstove) वाटप करण्यात आले.

        शहरातील श्री मुक्तानंद महाविद्यालायात झालेल्या निर्धूर चूल वाटपाप्रसंगी भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार सतीश चव्हाण, आयआय केअर फाउंडेशनचे संचालक डॉ.सतोष भोसले, माजी आमदार लक्ष्मणराव मनाळ, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, रावसाहेब तोगे, माजी नगरसेवक सुरेश नेमाडे, योगेश पाटील, बीजलताई साबणे, दिनेश गायकवाड, सोपान देशमुख, अमोल जगताप, सुधीर माने, राकेश कळसकर, शिवाजी मिसाळ आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

आ.सतीश चव्हाण म्हणाले की, गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने सर्वसामान्यांना ते भरून घेणे परवडत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणावर चुलीचा वापर केला जातो. मात्र या चुलीतून निघणार्‍या धुरामुळे पर्यावरण व महिलांच्या आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होत आहे. यावर उपाय म्हणून आम्ही ही निर्धूर चूल वाटप करत आहोत. या निर्धूर चुलीचे वैशिष्ट्ये म्हणजे पारंपारिक चुलीपेक्षा या चुलीला 50 टक्के पेक्षा कमी इंधन लागते. शिवाय यात धुराचे प्रमाण देखील कमी असल्याने कुटुंबियाचे आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने ही निर्धूर चूल नक्कीच उपयोगी ठरेल असा विश्वास व्यक्त करत भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापुढे देखील आम्ही लोकउपयोगी उपक्रम राबविण्यात येतील असे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले.

आयआय केअरचे संचालक डॉ.सतोष भोसले यांनी बदलत्या वातावरणामुळे पर्यावरण त्याच बरोबर नागरिकांच्या आरोग्यावर होणार्‍या परिणाम विशद करत आयआय केअर फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू नागरिकांना विविध माध्यमातून करण्यात येणार्‍या मदतीबद्दल मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!