तब्बल २० वर्षानंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा न्यु हायस्कूल शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा गेट – टुगेदर

जुन्या आठवणींना उजाळा देताना विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचेही डोळे पानावले

गंगापुर (प्रतिनिधी)
गंगापुर शहरातील प्रसिद्ध असलेल्या न्यु हायस्कूल प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या २००३ ते २००४ या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज तब्बल २० वर्षांनी गेट- टुगेदर च्या निमित्ताने गंगापुर शहरातील हॉटेल विराज वर सर्व माजी विद्यार्थी व शिक्षक एकत्र आले होते यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देताना विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनाही अश्रू अनावर झाले.
यावेळी
शिक्षक सोनवणे, कराळे ,नखाते , फलके , हराळकर, जगताप , ठानगे या शिक्षकांची प्रमुख उपस्थिती होती यांच्यासह माजी विद्यार्थी अंबिका दारुंटे, सरिता तिवारी, बबिता पानकडे,योगीता पानकडे, मनिषा लोणे, वैशाली तांबे, प्रिया चिखले,शोभा दनके, मनिषा सुकाशे,अमोल वाबळे,वाल्मिक सुकाशे, इमरान पठाण, संदिप मालोदे, संदिप वाखुरे,सुभाष खाजेकर, योगेश सोनवणे, गजानन गायकवाड, विशाल काटकर, मनोज राजपूत, जुबेर शेख, नुमेर शेख, ज्ञानेश्वर पवार, इमरान बागवान, कृष्णा सोनवणे, लक्ष्मण कुमावत, सचिन राजदेव,प्रदिप कांगरे,जावेद शेख, सोपान साळुंखे आदी उपस्थित होते
सुत्रसंचलन असद सय्यद, संदिप तारु, संतोष कटारे यांनी केले तर अंबिका दारुंटे अमोल वाबळे, अमोल आळंजकर यांनी आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!