नाट्यश्री कविता स्पर्धेतील सातव्या सत्रात ज्योत्स्ना बन्सोड विजयी


गडचिरोली (प्रतिनिधी) : स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली’ च्या वतीने नविन वर्षात *”आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता* ” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे सातवे सत्र नुकतेच पार पडले असून यात २५ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून नवोदित कवयित्री ज्योत्स्ना बन्सोड यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या *”ग्रंथाचे महात्म्य’* या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्रीचे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
ज्योत्स्ना बन्सोड या झाडीपट्टीतील नवोदित कवयित्री असून त्या गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील रहिवासी आहेत. आजवर त्यांनी विविध विषयांवर कवितांचे लेखन केले असून विविध स्पर्धातून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सातत्याने कवितालेखनाचे कार्य करीत आहे. नुकत्याच झालेल्या नाट्यश्री कविसंमेलनात’ त्यांनी मुलीसह सहभाग नोंदविला होता.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे व प्रा. अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या सातव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने संजय बन्सल, पुरुषोत्तम लेनगुरे, प्रशांत गणवीर , अहिंसक दहिवले , कृष्णा कुंभारे , दिनेश देशमुख , विलास जेंगठे, प्रभाकर दुर्गे, उपेंद्र रोहनकर, तुळशीराम उंदीरवाडे , प्रेमिला अलोने , मुर्लीधर खोटेले, चरणदास वैरागडे , प्रतिभा सुर्याराव, मनिषा हिडको , खुशाल म्हशाखेत्री , उत्तम गेडाम , नंदकिशोर नैताम , मिलिंद खोब्रागडे , गजानन गेडाम, प्रिती चहांदे, ज्योत्स्ना बन्सोड , सुजाता अवचट, लता शेंद्रे, , वंदना मडावी इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!