गंगापूर तालुक्यात मामाच्या गावी होत असलेले दोन बालविवाह पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळले


गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील सुलतानाबाद व शहापूर घोडेगाव येथे होत असलेल्या दोन अल्पवयीन मुलीचे बालविवाह पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळले असुन पालकांचे व नातेवाईकांचे समुपदेशन करण्यात आले
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार १८ फेब्रुवारी रोजी वैजापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी महक स्वामी यांना गोपनीय माहिती मिळाली की वैजापूर तालुक्यातील म्हस्की येथील एका अल्पवयीन मुलीचा गंगापूर तालुक्यातील सुलतानाबाद येथे तिच्या मामाच्या घरी बालविवाह होणार आहे. अशी खात्रीशीर गोपनीय माहीती मिळाल्यावरून
महक स्वामी यांच्या सूचनेप्रमाणे दामिनी पथकाच्या सपोनि आरती जाधव यांनी तात्काळ माहिती मिळालेल्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता तेथे विवाह सोहळा संपन्न होणार असल्याबाबतची पूर्ण तयारी दिसून आली. यावरून दामिनी पथकाने तात्काळ मुलीच्या आई-वडिलांची भेट घेतली व त्यांना विश्वासात घेऊन अधिक चर्चा केली असता त्यांनी मुलीचा विवाह लावून देत असल्याचे मान्य केले. मुलीचे वय तपासले असता तिचे वय १५ वर्ष २ महिने असल्याचे निष्पन्न करून ती अल्पवयीन असल्याबाबत आई-वडिलांच्या निदर्शनास आणून दिले.तसेच दुसऱ्या घटनेत
शहापूर घोडेगाव येथील १७ वर्षे ५ महिने वय असलेल्या मुलीचेही तिच्या मामाच्या गावी तांदूळवाडी शिवारातील मळ्यात बालविवाह होणार असल्याने शिल्लेगाव पोलिसांनी नमूद ठिकाणी बालविवाह होणार असल्याची खात्री केली. यावरून दामिनी पथकाचे सपोनि आरती जाधव व चाईल्डलाईनचे समुपदेशक यशवंत इंगोले, निलेश दूर्वे यांनी वरील ठिकाणी तातडीने धाव घेऊन तेथील मुलींच्या पालकांचे भेटी घेऊन त्यांना बालविवाहामुळे मुलींच्या आयुष्याबाबत होणाऱ्या दुष्परिणामाबाबत व कायदेशीर बाबींची संपूर्ण माहिती देऊन पालकांचे व नातेवाईकांचे समुपदेशन केले त्यामुळे आई वडील त्यांचे मन व मत परिवर्तन होऊन त्यांनी हा विवाह न करण्याचे मान्य केले आहे.
तसेच मुलगी ही सज्ञान झाल्यानंतरच तिच्या मर्जीनुसार तिचा विवाह करू असे आवर्जून सांगितले.
याविषयी चाइल्डलाईन तर्फे बंधपत्र लिहून घेऊन दोन्ही बालविवाहातील अल्पवयीन मुलींना बालकल्याण समितीच्या समक्ष हजर करण्यात येऊन त्यांचे निर्देशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया:-
पालकांनी अल्पवयीन मुलांचे लवकर लग्न करण्याचा घाट न धरता तिला उच्चतम शिक्षण देण्यास प्रवृत्त करावे, ज्यामुळे भविष्यात मुली स्वतःचे पायावर उभे राहू तिचे स्वतःचे उज्वल भविष्य निर्माण करून समाजात तिची एक विशिष्ट ओळख निर्माण करू शकेल.
वरील कारवाई मनीष कलवानिया पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाचे स पो नि आरती जाधव पो. ना. कपिल बनकर, पोअं इर्षाद पठान म.पो.अ जयश्री महालकर व चाइल्डलाईनचे समुपदेक यशवंत इंगोले आणि निलेश दूर्वे तसेच शिल्लेगाव पो. स्टे. चे स फौ आपसनवाड यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!