भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त आघाडी गंगापूर शहराध्यक्षपदी हनुमंता मामडे


गंगापूर (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी गंगापूर शहर भटक्या व विमुक्त आघाडीच्या शहराध्यक्षपदी हनुमंता लक्ष्मण मामडे याची निवड
गंगापूर शहरातील मसनजोगी समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते हनुमंता लक्ष्मण मामडे यांची आमदार प्रशांत बंब तसेच भाजप नेते किशोर धनायत यांच्या उपस्थितीमध्ये तालुका अध्यक्ष भाजपा गंगापूर रवींद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त आघाडी गंगापूर शहराध्यक्षपदी निवड केली आहे. याप्रसंगी आमदार प्रशांत बंब,भाजप नेते किशोर धनायत माजी नगराध्यक्ष प्रदीप भैय्या पाटील, दीपक साळवे,तांडा वस्ती जिल्हा अध्यक्ष राजेंद्र राठोड, गोपाल वर्मा,भाजपा शहराध्यक्ष मारुती खैरे,रामेश्वर पाटील, पप्पू पाटील,अनिल चव्हाण, कृष्णा सुकाशे,कृष्णकांत व्यवहारे,प्रशांत मुळे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य अतुल रासकर,भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते यावेळी समाजातील मसन जोगी समाजाचे नेते शामराव कडमिचे,चंद्र शिंदे, व्यंकट शिंदे,राजू कडमिचे,सकाराम कडमिचे, लक्ष्मण मामडे,मारुती मामडे,आकाश उबदे,बाळू उबदे, सखाराम मामडे,आधी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.हनुमंता मामडे यांना भारतीय जनता पार्टीचे पुढील काम करण्यासाठी भारतीय जनता पार्टी सर्व विमुक्त भटक्या आघाडीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटन बळकट करण्यासाठी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या मसनजोगी समाजातील कष्ट करून पोट भरणाऱ्या नागरिकांना आमदार प्रशांत बंब यांच्यातर्फे लवकरच आर्थिक मदत करण्यात येणार आहे त्या माध्यमातून त्यांना व्यवसाय करता यावा त्याकरता त्यांना साहित्य पुरवले जाणार आहेत तसेच व्यायामशाळेसाठीही मदत करून दिली जाणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!