उपमुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलिस अधीक्षकासह चारशे अधिकारी व पोलिस बंदोबस्तासाठी तैनात पोलिस अधीक्षक:- मनीष कलवानिया

उपमुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलिस अधीक्षकासह चारशे अधिकारी व पोलिस बंदोबस्तासाठी तैनात पोलिस:-अधीक्षक मनीष कलवानिया
गंगापूर (प्रतिनिधी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गंगापूर वैजापूर तालुक्यातील ३७३ गावांना हर घर नल से जल या योजनेचा शुभारंभ व मोदी @9 महा जनसंपर्क अभियान अंतर्गत गंगापूर वैजापूर वॉटर ग्रीड चा जलारंभ व लाभार्थी मेळावा व जाहीर सभा ३० जुन रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे या कार्यक्रमस्थळी २९ जुन रोजी आमदार प्रशांत बंब, जिल्हाधिकारी अस्तिकुमार पांडे, तहसीलदार सतीश सोनी,पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, पुजा नांगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले, प्रभारी पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, सपोनी शाईनाथ गिते, सपोनी अशोक चौरे, प्रल्हाद मुंढे, पोलिस उपनिरीक्षक शकील शेख, दिपक औटी, अझर शेख, राजेंद्र सावंत, स्थानिक गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक आदींनी पाहणी करून बंदोबस्ताचे नियोजन केले यासाठी पंधरा उपविभागीय पोलिस अधिकारी, पन्नास पोलिस निरीक्षक, सपोनी, पोलिस उपनिरीक्षक व ३०० पोलिस तैनात करण्यात येणार आहे तरुणांना गायी वाटपासह विविध योजनांच्या लाभार्थींना लाभ देण्यात येणार असल्याचे आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले.


या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे . केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना.डॉ भागवत कराड,सहकार मंत्री मा. अतुल सावे आमदार प्रशांतजी बंब यांची प्रमुख उपस्थितीत 30 जुन रोजी सकाळी ११.०० वाजता नवीन तहसील कार्यालयाच्या पाठीमागे म्हाडा कॉलनी जवळ संपन्न होत असुन या कार्यक्रमाला गंगापूर वैजापूर खुलताबाद तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार प्रशांत बंब यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!