एक आदर्श मुलगा जर प्रत्येक आईला घडवायचा असेल, तर त्यासाठी प्रत्येक आईने राजमाता जिजाऊंचे आचरण केले पाहिजे- आमदार प्रशांत बंब

गंगापूर (प्रतिनिधी)आपल्या मुलांवर सुसंस्कार कशा पद्धतीने केले पाहिजेत, त्यांना सक्षम आणि खंबीर कसे बनवले पाहिजेत या सर्व गोष्टींचे उत्तम उदाहरण आपल्या राजमाता जिजाऊ माँसाहेब आहेत. एक आदर्श मुलगा जर प्रत्येक आईला घडवायचा असेल, तर त्यासाठी प्रत्येक आईने राजमाता जिजाऊंचे आचरण केले पाहिजेत आमदार प्रशांत बंब


पुढे बोलताना बंब म्हणाले की दिवसभराच्या दिनचर्येत किमान कणभर तरी महापुरुषांचे विचार डोक्यात घेतल्याशिवाय आपल्या महापुरुषांच्या प्रति दिल्या जाणाऱ्या जयघोषाला अर्थ नाही तो फक्त दिखावा आहे. ज्या प्रमाणे जिजाऊंनी आपला मुलगा शिवबाराजेंना रयतेचे, स्वराज्याचे लहानपणी जे धडे दिले होते अगदी त्याच प्रमाणे प्रत्येक माताने आपल्याला मुलाला महापुरुषांच्या इतिहासाची माहिती देऊन मुलांना प्रेरित करावे तरच आपला जयजयकाराला खऱ्या अर्थाने महापुरुषांच्या जयंती प्रति खरा आदर असेल.

लासुर स्टेशन येथून जवळच असलेल्या नागपूर मुंबई महामार्गावरील देवळी या गावात काही दिवसांपूर्वी शिवप्रेमींकडू बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ स्मारक व त्या परिसरातील सुशोभीकरण भूमिपूजन सोहळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त बंब यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेषरावनाना जाधव संचालक संतोष जाधव, माजी सरपंच प्रदीप भुजबळ, रमेश जाधव, धर्मवीर आध्यत्मिक सेनेचे जिल्हाप्रमुख कडूबाळ गवांदे महाराज, बाजप महिला मोर्चा अध्यक्ष शीला गाढे यांची उपस्थिती होती.
दरम्यान पुढे बोलतांना तरुणांनी महाराजाच्या जयंतीनिमित्त व्यसनमुक्तीचा संकल्प करावा. देवळी हे गाव आता टप्याटप्याने विकसित होणार आहे. कारण इथे साकारण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे ऐतिहासिक असणार आहे. महाराजांचे इथे येऊन जे भक्त दर्शन करणार आहेत त्याचे वलय, तयार होऊन मनुष्य जीवनाला कलाटणी देणारे ठरणार असल्याचे आमदार बंब यांनी सांगून महाराजांच्या पुतळ्याच्या नावीन्य प्राणप्रतिष्ठावेळी राज्यातील प्रत्येक गड, किल्ल्याच्या पायथ्याची माती आणून करणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य मनीष पोळ, विलास सोनवणे, शफिक शेख, ज्ञानेश्वर कराळे, रमेश तायडे, दादासाहेब तायडे, सुनील वंजारेझ कैलास तायडे, मिलिंद वंजारे, जावेद शेख, वसंत जाधव, संतोष तायडे, साईनाथ तायडे, एकनाथ तायडे, संदीप तायडे, भगवान तायडे, संजय कराळे, रंजीत कराळे, सचिन तायडे, अभिषेक तायडे, राहुल तायडे, विशाल तायडे, नवनाथ अहिरे, सोमनाथ अहिरे, सुनील तायडे, नंदू कराळे, ज्ञानेश्वर तायडे, संजय वंजारे, बाबासाहेब वंजारे, विजय कराळे, जनार्धन तायडे, अर्जुन कराळे, पांडुरंग तायडे, आप्पासाहेब जगदाळे, अशोक जगताप, संदीप आढाव, कृष्णा पराड, चंद्रकांत गवळी यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक महिला बघिणी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!