गंगापूरचा विठोबा पंढरपूरच्या भेटीला रवाना….

गंगापूरचा विठोबा पंढरपूरच्या भेटीला
(गंगापूर प्रतिनिधी) सालाबाद प्रमाणे यावर्षी श्री विठ्ठल आश्रम जाखमाथा गंगापूर येथून तुकाराम गाथेचे गाढे अभ्यासक ह भ प गाथामूर्ती गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत बाबा यांच्या नेतृत्वाखाली पायी दिंडी 9 जुन रोजी आश्रमापासून निघाली आहे पायी दिंडीचे 40 वे वर्ष असून ही पायी दिंडी सकाळी सात वाजता निघाली या दिंडीत शेकडो वारकरी व महिला वारकरी सामील झाले होते वारकऱ्यांचा अंगावरील पोशाख पांढरा शुभ्र व खांद्यावर हिंदू धर्माची पताका तर काही महिलांच्या डोक्यावर तुळशीचे कलश होते शहरात ठीक ठिकाणी या पायी दिंडीचे स्वागत केले गेले हरिनामाच्या गजरात ही दिंडी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते माहेश्वरी मंगल कार्यालय येथे अल्पोउपहारानंतर नगरसेवक ज्ञानेश्वर साबणे यांच्या निवासस्थानी जाऊन चहापाणी घेतला पुन्हा ही दिंडी हरिनामाच्या गजरात पंढरपूरकडे मार्गस्थ झाली ठिकठिकाणी नागरिकांनी फटाके वाजवून दिंडीचे स्वागत केले विठ्ठलाच्या रथाचे नेतृत्व रामभाऊ महाराज राऊत हे करत आहेत ही दिंडी दुपारी कायगाव येथे दहीतुले परिवाराकडे भोजनासाठी थांबली होती सायंकाळी 4 वाजता गोदावरीचा फुल ओलांडून पश्चिम महाराष्ट्रात प्रवेश केला दिंडीचा पहिला मुक्काम प्रवारासंगम येथील पेट्रोल पंपाच्या बाजूला लॉन्स वर आहे ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता वारकरी विठोबाच्या भेटीसाठी अतुरलेले दिसले या सोहळ्यासाठी गंगापूर आश्रमावर प्रेम करणाऱ्या विविध संघटना व आश्रम श्रद्धा ठेवणाऱ्या असंख्य वारकऱ्याचे योगदान लाभलेले आहे या कामी श्री विठ्ठल आश्रम भक्त परिवारांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!