लोकसभा निवडणुकीच्या कामात गंगापुरच्या हलगर्जीपणा करणा-या १६ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस


गंगापूर (प्रतिनिधी) लोकसभा निवडणूक कामात हलगर्जीपणा करुन दिलेल्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या १६ बीएलओ अधीका-यांना कारणे दाखवा नोटीस निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सुचिता शिंदे यांनी बजावली.
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक पूर्व तयारीच्या अनुषंगाने १११ गंगापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना मतदार यादीचे निरंतर पुनरीक्षण करण्याचा कार्यक्रम चालू आहे या कामासाठी एकूण ३२८ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी। बी एल ओ यांची नेमणूक केलेली आहे या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा ८५ वर्ष पेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांना आणि ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असणाऱ्या मतदारांना घरी मतपत्रिका देण्याचा पर्याय दिलेला आहेत तसेच व्हीआयपी मतदार यादी. BAG, चुनाव पाठशाळा व लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अनुषंगिक कामे करण्याच्या सूचना दिनाक २८ फेब्रुवारी रोजी गंगापूर तहसील कार्यालय येथे झालेल्या बैठकीत सर्व क्षेत्रीय अधिकारी, बी एल ओ यांना वरील सूचना देण्यात आल्या आहेत तरी ३२८ मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांपैकी पुढील बी एल ओ जी भाग क्र. २१५ श्रीमती एम. ई खरात वाळूज भाग क्र. २१९ श्रीमती एम एस घुले वाळूज भाग २९९ मनोज म्हस्के ढोरेगाव भाग क्र २८८ श्री एस वाय वाघ गंगापूर भाग क्र २९० श्री आर जे हराळकर भाग क्र. २९८ श्रीमती एस डी मोरे गंगापूर भाग क्र २९९ श्री जी एस शिरसाठ गंगापूर भाग ३०२ श्री एस. बी देवढे गंगापूर आग क्र ३०३ श्रीमती एम पी जाधव गंगापूर भाग क्र १०४ श्रीमती. एस. ए. रहाटवाड गंगापूर भाग क्र. ३०९ श्री. पी. एस. सोनटक्के गंगापूर भाग क्र ३ श्रीमती सी आर बोरसे गंगापूरभाग क्र. ३११ श्रीमती आर टी ठाकूर गंगापूर भाग चित्रकला येवले डोणगाव भाग क 133 श्रीमती व्ही. व्ही कान्हडकर खड़क नारळा भाग १३४ श्रीमती बी डी भांबरे वसूसायगाव यानी वारंवार सूचना देऊन ही लोकसभा निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याचे दिसून येते. या निवडणूक विषयक कामात दिलेल्या कालावधीत कामात दुर्लक्ष केल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजविण्यात आल्या असून दोन दिवसात खुलासा मागविण्यात आला आहे विहित मुदतीत खुलासा प्राप्त न झाल्यास किंवा खुलासाः समाधानकारक नसल्यास लोकप्रतिनिधित अधिनियम १९५० चे कलम ३२ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होणार आहे अशा माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सुचिता शिंदे यांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!