गंगापूर खुलताबाद तालुक्यात ३४८ मतदान केंद्रावर निवडणून प्रक्रिया पार पडणार असून ३ लाख ४४ हजार ३९४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार-डॉ सुचिता शिंदे


गंगापूर (प्रतिनिधी)गंगापूर खुलताबाद तालुक्यात ३४८ मतदान केंद्रावर निवडणून प्रक्रिया पार पडणार असून १२२ कर्मचारी काम पाहत असुन ८ मतदान केंद्र क्रिटिकल असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सुचिता शिंदे यांनी सांगितले.
तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सुनिता शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सतीश सोनी, खुलताबाद तहसीलदार
स्वरुप कंकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. बोलताना शिंदे यांनी सांगितले की लोकसभा सार्वत्रिक निवडणूक नजीकच्या काळात पार पडणार आहे. त्याअनुषगाने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी १९ छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघ दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली १११ गंगापुर विधानसभा मतदार संघात एकूण ३४८ मतदान केंद्रावर निवडणून प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रियेत विविध पथकांचे १६ नोडल अधिकारी, ३३ क्षेत्रीय अधिकारी व त्यांना ३३ सहाय्यक, ४० मास्टर ट्रेनर असे एकूण १२२ कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहे. गंगापूर मतदार संघातील ३४८ मतदान केंद्रापैकी १ महिला मतदान केंद्र, १ दिव्यांग मतदान केंद्र, १ युवा मतदान केंद्र, २ आदर्श मतदान केंद्र, तसेच स्थलांतरित अनुपस्थितीत व मयत मतदाराची संख्या जास्त असल्याने ८ मतदान केंद्रे क्रिटिकल सदरात घेतली असून १७४ मतदान केंद्राकर वेब काष्टींग करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत मतदार यादीत पुरुष १८०९१६ , महीला (स्री) १६३४८८ व इतर २२ असे एकूण ३४४३९४ नावे समाविष्ठ आहेत.

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी MCC, FST-18, VST-6.SST-9, VVT-1

पथके नियुक्त करण्यात आलेली असुन यामध्ये १ पथक प्रमुख २ साहाय्यक, १ पोलीस कर्मचारी व व्हिडीओग्राफर असणार आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून नागरिकांसाठी देण्यात आलेल्या c vigil ॲप वरून निवडणूक काळातील गैरप्रकाराबाबत तक्रारी करता येणार आहेत तक्रारीचे निराकरण करण्यासाठी IT FST पथकाकडून कार्यवाही करण्यात

येणार आहे. EVM ठेवण्यासाठी इनडोअर स्टेडीयम श्री मुक्तानंद महाविद्यालय गंगापुर, निवडणूक साहित्य वितरण व

स्विकारण्यासाठी न्यू हायस्कूल गंगापूर हे ठिकाण निश्चित करण्यात आलेले आहे . उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सुनिता शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सतीश सोनी, खुलताबाद तहसीलदार
स्वरुप कंकाळ हे काम पाहणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!