सावंगीच्या भैरवनाथ बाबांच्या मंदिराचें भूमिपूजन देवगडचे महंत प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न

सावंगी, लासूर स्टेशन सह पंचक्रोशीतील हजारो भाविकाचीं उपस्थिती.

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील लासूर स्टेशन ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सावंगी येथील नवसाला पावणाऱ्या भैरवनाथ बाबांच्या नवीन मंदिराच्या कामाचा शुभारंभ व भूमिपूजन २७ मे रोजी सायंकाळी साडे पाच वाजता देवगड संस्थानचे महंत प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी गंगापूर खुलताबादचें आमदार प्रशांत बंब, आमदार आंबादास दानवे, बिआरएसचें नेते संतोष पाटिल माने, बाजार समितीचे सभापती शेषराव जाधव, सरपंच मीनाताई पांडव, यांची प्रमुख उपस्थिती होती.
अनिल जाधव, उपसरपंच संपत छाजेड, मर्चन्ट बँकेचे संचालक प्रितमशेठ मुथा, प्रतीक चंडालिया, रवींद्र चव्हाण, गोपाळ वर्मा, बाजार समितीचे सर्वं संचालक, ग्रामपंचायतचे सर्वं कर्मचारी, यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिका यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्रह्मवृंदाच्या जयघोशांत भुमीपुजन करण्यात आले. बांधकाम समितीचे अध्यक्ष अशोक म्हसू पवार, उपाध्यक्ष संजय पांडव, सचिव दादा तुळशीराम पवार यांचीही उपस्थिती होती.
दरम्यान देवगडचे महंत प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या आगमननंतर स कुठे आहे सर्व गावाकऱ्यांच्या वतीने संतपूजन करून वाजतगाजत महाराजांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी आमदार प्रशांत बंब, आ.आंबादास दानवे यांची समयोचित मार्गदर्शन झाले आभार सरपंच मीनाताई पांडव यांनी मानले कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!