महावितरण मिल कॉर्नर छत्रपती संभाजीनगर यांच्या दालनाचा शेकडो नागरिक ताबा घेणार… रविंद्र चव्हाण

महावितरण मिल कॉर्नर छत्रपती संभाजीनगर यांच्या दालनाचा शेकडो नागरिक ताबा घेणार … रविंद्र चव्हाण
गंगापूर (प्रतिनिधी)सरपंच पती सुदाम भडके यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्या तोडकर यांच्यावर दहा दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न केल्याने २९ मे रोजी व्यवस्थापकीय सहसंचालक महावितरण व मुख्य अभियंता महावितरण मिल कॉर्नर छत्रपती संभाजीनगर यांच्या दालनाचा शेकडो नागरिक ताबा घेणार… रविंद्र चव्हाण

गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील रोहित्र जळाल्यानंतर ते रोहित्र दुरुस्त करून द्यावे अन्यथा हंडा मोर्चा घेऊन येऊ असे म्हटल्यानंतर मुजोर अधिकाऱ्यांनी रोहित्र दुरुस्त करून द्यायचे सोडून सरपंच पती सुदाम भडके यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला. याविरुद्ध ग्रामसंवाद सरपंच संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष व धामोरी खुर्द चे उपसरपंच रवींद्र चव्हाण यांनी सुदाम भडके यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करणे बाबत पत्र दिले होते.परंतु दहा दिवस उलटूनही वरिष्ठांनी अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने उद्या सोमवार दि. 29 मे 2023 रोजी महावितरणचे व्यवस्थापकीय सहसंचालक व मुख्य अभियंता यांच्या दालनाचा शेकडो नागरिक ताबा घेणार आहेत व जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत त्या दालनाचा ताबा सोडणार नसल्याचे उपसरपंच रवींद्र चव्हाण यांनी जन आक्रोशच्या प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!