डोणगावजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात, एक ठार

डोणगावजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात, एक ठार

समृद्धी महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा, परवा चार भावांचा करुण अंत.
गंगापूर (प्रतिनिधी)
समृद्धी महामार्गवरील अपघातांची मालिका व त्या अपघातात बळी जाणारा निष्पाप जीवांची मालिका थांबायला काही तयार नाही दोन दिवसांपूर्वी सख्या चार भावांडाच्या अपघाती मृत्यूची घटना ताजी असतानाच गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील डोणगाव येथे २७ मे रोजी सकाळच्या सुमारास दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करताना वाहनवरील चालकाचा ताबा सुटल्याने अपघात होऊन बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील विनय सातपुते (३३) या प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे.
या घटनेची माहिती देताना समृद्धी महामार्गवरील सुरक्षा पर्यवक्षक कृष्णा बडे यांनी सांगितले कीं सदर अपघात डोणगाव येथे घडला QRV टीमने तात्काळ अपघातग्रस्त गाडीमधील जखमी व्यक्तीना रुग्णवाहिका मधून घाटी हॉस्पिटलला तात्काळ हालवले होते अपघातग्रस्त गाडीमालक यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की गाडी क्रमांक एम एच १३ ए एन ९०२६ (टेम्पो ४०७) वैजापूरवरून जालन्याकडे जात असताना डोणगाव येथे ओव्हरटेक करत असताना अपघात झाला आहे, गाडी दोन्ही कॉरिडोरच्या मध्ये पलटी झाली सदर माहिती तात्काळ महामार्ग पोलीस नागवे, शिल्लेगाव पोलीस व महामार्ग कंट्रोल यांना देण्यात आली, त्यांनीही घटनास्थळाला भेट दिली अपघातग्रस्त गाडी क्रेनच्या साह्य्याने उभी केली, सदर गाडीमध्ये एकूण चार प्रवाशी होते त्यात रहीम शेख (वय 35) चालक किरकोळ जखमी झाला असून विनय सातपुते अंदाजे (33) यांचा मृत्यू झाला तर रशीद शेख (वय 29) हेल्पर) रईस शेख (वय 32) हेही किरकोळ जखमी झाले असून सर्वं बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील रहिवाशी आहेत.
दरम्यान घटनास्थळी – महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षा पर्यवेक्षक कृष्णा बडे, सुरक्षा रक्षक रामेश्वर गांगुर्डे, संजय लोहार – भगवान उगले, रोहित थोरात, महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलिस उपनिरीक्षक नागवे, काकड, शिल्लेगांव पोलीस, QRV टीमचे वैभव चौधरी, गौरव गवळी, रामेश्वर निकम,ॲम्बुलन्स : चालक सोनवणे, क्रेन: चालक चेतन पगार, हेल्पर- वाल्मीक थोरात आदिनी अपघातस्तळी भेट दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!