कल्याण मटका घेणा-या तिघांना अटक २२ हजार रुपये रोख व मुद्देमाल जप्त

कल्याण मटका घेणा-या तिघांना अटक २२ हजार रुपये रोख व मुद्देमाल जप्त.
गंगापूर (प्रतिनिधी)
औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाच्या गंगापूर येथील दोन कल्याण मटक्यावर ठिकाणी धाडी टाकून तिघांना ताब्यात घेतले.

गंगापूर शहरात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून या अवैध धंद्यांमध्ये कल्याण – मटका जुगार जोरात सुरू आहे. यामधून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. कल्याण मटका जुगार अड्ड्यांवर औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या विशेष पथकानी शनिवारी २७ मे रोजी बसस्थानक रोडवरील दोन ठिकाणी धाड टाकून कल्याण मटका नावाने जुगार चालवत असलेले गंगापूर बसस्थानक रोडवरील एका दुकानात कल्याण मटका नावाने जुगार चालवत असलेल्या आरोपी शब्बीर गनी शहा व दिलीप बळवंत घाडगे राहणार सखाराम पंतनगर गंगापूर यांच्या ताब्यातून 10 हजार 200 रुपये रोख व इतर साहित्य तसेच दुसऱ्या एका कारवाईत आरोपी सचिन निवृत्ती बोराडे राहणार अहिल्यादेवी नगर गंगापूर याचे ताब्यातून 11 हजार 700 रुपये रोख व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये पोलीसांच्या तक्रारीवरून
शब्बीर गनी शहा व दिलीप बळवंत घाडगे व सचिन निवृत्ती बोराडे या तिघांनवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई औरंगाबाद पोलीस अधीक्षक ग्रामीण मनीष कलवानीया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सुरजसिंग बिघोत, जमादार गोपाल पाटील, दांडगे, भाऊसाहेब आहेर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!