३० हजार एकर शेती ओलिताखाली येणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ११ जानेवारीला गंगापूर ब्रम्हगव्हाण जलसिंचन योजनेचे उद्घाटन करणार. तयारी अंतिम टप्प्यात. आ. प्रशांत बंब यांच्या पुढाकारातून योजना लवकरच कार्यान्वित होणार

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर तालुक्यातील चाळीस गावातील तिस हजार एकर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी आमदार प्रशांत बंब यांच्या प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले असुन गंगापूर ब्रम्हगव्हाण जलसिंचन योजनेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ११ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता आरापुर शिवारात करण्यात येणार आहे या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
गंगापुर तालुक्यातील चाळीस गावातील लाभधारक शेतकऱ्यांना शेती सिंचनाची व्यवस्था व्हावी या उद्देशाने ब्रह्मगव्हाण जलसिंचन योजनेच्या कामाला प्रारंभ करण्यात येत आहे. योजनेमुळे तीनही हंगामात पाणी मिळून शेतकरी आर्थिकदृष्टया सधन होईल आणि त्यांचे जीवनमान उंचावेल. यासाठी आ, प्रशांत बंब यांनी जलसंपदा विभागांतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा करून योजना मंजूर करून घेतली. ज्यामुळे ३० हजार एकर शेतीसिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सदरील योजनेचे काम २४ महिन्यांमध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती आ. प्रशांत बंब यांनी दिली.
नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेली फरफट पाहून आ. बंब यांनी मागील वर्षी गंगापूर येथे ३० जून रोजी जलजीवन मिशन या ऐतिहासिक योजनेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलारंभ करून हर घर नल से जल योजनेचे काम हाती ती घेतले. तत्पूर्वी तालुक्यात नदी खोलीकरणाचे काम हाती घेतले होते.
गंगापूर खुलताबाद मतदार संघाचे आमदार प्रशांत बंब यांनी साडेआठशे कोटीची जलजीवन मिशन घर घर नलसेजल योजनेचा काही महिन्यांपूर्वी शुभारंभ केला होता तर त्यांच्याच प्रयत्नातून गंगापूर ब्रम्हगव्हाण जलसिंचन योजनेच्या माध्यमातून ४० गावांतील ३० हजार एकर जमीन ओलिताखाली येणार असून कायमस्वरूपी जलस्रोतांतून वीज पाणी आणि उत्पन्न हा त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्यासाठी या योजनेचा शुभारंभ ११ जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या हस्ते होणार आहे.

गंगापूर खुलताबाद तालुक्याचे विद्यमान आमदार प्रशांत बंब यांनी मतदार संघाच्या विकास कामांचा धडाका लावला आहे यामुळें उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार प्रशांत बंब यांचा गुणगौरव केला आतापर्यंत साडेआठशे कोटीची जलजीवन मिशन घर घर नलसे जल या योजनेचा शुभारंभ करण्यात आला तर गंगापूर ब्रम्हगव्हाण जलसिंचन योजना सुरू करण्यात येत आहे.
आमदार बंब यांनी प्रत्येक लाभार्थ्याला लाभाच्या योजना स्वतः जातीने लक्ष घालून त्या पूर्णत्वास नेऊन त्याचा लाभ त्यांना प्रत्यक्षात देऊन गोरगरीब ,पीडित ,दिन दुबळ्यांच्या शेतकऱ्यांच्या मनात घर केल्यामुळे त्यांचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी गंगापूर येथे गुणगौरव केला त्याच्याच प्रयत्नातून चाळीस गावांना पूरक पाणी ब्रम्हगव्हाण जलसिंचन योजनेतुन ३० हजार एकर जमीन ओलिताखाली येत असून त्या योजनेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार रोजी आरापूर शिवारातील नियोजित जागी होत आहे उद्घाटनाची जंगी तयारी सुरू असून कुठल्याही प्रकारची कमी भासू नये म्हणून गंगापूर खुलताबाद तालुक्याचे विद्यमान आमदार विकास पुरुष तथा योजना सम्राट प्रशांत बंब हे स्वतः लक्ष घालुन आहे उद्घाटनाच्या दिवशी गोरगरीब लाभार्थ्यांना तसेच अकुशल कामगारांना उपयुक्त पेट्यांचे वाटप करण्यात येणार आहे आतापर्यंत मतदार संघात लाभ देण्याची तिसरी वेळ असून हजारो लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे अनेक लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र . दारिद्र्यरेषेचे प्रमाणपत्र. उत्पन्न प्रमाणपत्र असो अथवा शिधापत्रिका असो ही सर्व कामे त्यांच्या माध्यमातून लोकांच्या दारापर्यंत तळागाळातील लोकापर्यंत पोहोचवल्या आहे गरजवंत लाभार्थ्यांना अनेक लाभाच्या योजना या ठिकाणी देण्यात येणार आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा कलाकारांसाठी स्पर्धा अशा अनेक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून खऱ्या गुणवंतांचाही गुण गौरव या ठिकाणी करण्यात येणार आहे .या सर्व कार्यक्रमाला गंगापूर खुलताबाद मतदार संघातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार प्रशांत बंब व भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!