जिजाऊ महिला फाउंडेशनच्या वतीने गंगापूर तालुक्यातील महिलांसाठी भव्य गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन

जिजाऊ महिला फाउंडेशनच्या वतीने गंगापूर तालुक्यातील महिलांसाठी भव्य गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन


गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर तालुक्यातील महिलांसाठी जिजाऊ महिला फाउंडेशनच्या वतीने भव्य गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .
या स्पर्धेतील विजेत्यांना संतोष ज्वेलर्स (मांजरीकर) यांच्या तर्फे प्रथम पारितोषिक २ ग्रॅम सोन्याची अंगठी,द्वितीय पारितोषिक १ ग्रॅम सोन्याची नथ, तृतिय पारितोषिक १ पैठणी, चतुर्थ पारितोषिक आकर्षक पाच साडी तसेच सहभागी स्पर्धकांना आकर्षक उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात येणार असल्याचे संतोष ज्वेलर्स (मांजरीकर) चे व्यवस्थापक संतोष अंबिलवादे यांनी सांगितले .
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नांव नोंदणी आवश्यक असुन शुक्रवार २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०६ वाजेपर्यंत नांव नोंदणी करावी. परिक्षक शनिवार २३ सप्टेंबर रोजी दु. ३ वाजेपासुन रात्री ८ वाजेपर्यंत प्रत्येकांच्या घरी येऊन गौरी सजावट पाहुन परिक्षण करतील नियम व अटीसह आयोजकाचा निर्णय अंतिम राहील.
बक्षीस वितरण समारंभ दिनांक व वेळ कळविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांनी नांव नोंदणीसाठी जिजाऊ फाऊंडेशन अध्यक्षा सुवर्णाताई जाधव मो. ७५८८५३०१४४, अर्चनाताई कदम मो. ९४०४९७८३८२, कावेरीताई पाहुणे मो. ७५८८३४८१७०,अश्विनीताई नेमाडे मो. ८३२९८०७४४० , संगिताताई खोचे मो. ७७७५०२१८५४, रेखाताई राजपूत मो.८९९९२७३४२०, ताराताई पदार मो.८९९९००४०६३, संगिताताई वाघ मो. ९७३०९१६७७६, सविताताई साळुंके मो. ७३८५५५०७८३, शितलताई नावंदर मो. ८९५६९७७९७७,सुनिताताई सोळके मो.९३२५२९४७०३, संगीताताई अंबिलवादे ,वैशालीताई अंबिलवादे यांच्याशी संपर्क साधावा या स्पर्धेसाठी संतोष अंबिलवादे मित्र मंडळ व समस्त पत्रकार बांधवांचे सहकार्य लाभले‌ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!