गंगापूर गटविकास अधिकारी यांच्या मेहरबानीमुळे ४०९ सौचालयाचे ४९ लाख रुपयांचा गैरव्यवहार करणारा ग्रामसेवक सुसाट

गंगापूर (प्रतिनिधी)गंगापूर गटविकास अधिकारी यांच्या मेहरबानीमुळे ४०९ सौचालयाचे ४९ लाख रुपयांचा गैरव्यवहार करणारा ग्रामसेवक सुसाट
गंगापूर तालुक्यातील पिंपळगाव दिवशी ग्रामपंचायत २०१७ ते २०२१ या कार्यकाळात तब्बल 49 लाख.8 हजार रुपयाचे वैयक्तिक शौचालय आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नागरिक पंकज नन्नवरे यांनी दिलेल्या तक्रारी नूसार चौकशीत दोषी आढळलेले तत्कालीन ग्रामसेवक अे. के. शेख यांना घोडेगाव,सिध्देनाथवाढगाव,बुट्टेवाढगाव,वडाळी (खोफेश्वर, मेंडी) आदी गावाची जबाबदारी देण्यात आली आहे. सन २०१७ ते २०२१ या कार्यकाळात गंगापूर पंचायत समिती द्वारे देण्यात आलेले वैयक्तिक शौचालय अनुदान परस्पर इतरांना वाटप प्रकरणी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता त्यानुसार तत्कालीन गटविकास अधिकारी यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.त्याच तत्कालीन गट विकास अधिका-यांचा आवडता ग्रामसेवक अे के शेख यांच्या विरोधात वैयक्तिक शौचालय अनुदान आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी विभागीय चौकशी अहवाल क्रं -3 नुसार ग्रामपंचायत पिंपळगाव दिवशी यांनी सन 2017 ते 2021 या वर्षात 409 वैयक्तीक शौचालयासाठी रु.49.08,000/- इतके SEM अंतर्गत प्राप्त झाले असुन सदर कामात खालील प्रमाणे अनियमितता आढळून आली आहे

1) स्वच्छ भारत मिशन वैयक्तीक शौचालय योजनेचे स्वतंत्र खाते ठेवलेले नाही.

2) लाभार्थीचे संमतीपत्र व अर्ज घेतलेले नाही. लाभार्थी स्वतः शौचलयाचे बांधकाम करीत नसल्यामुळे इतर व्यक्तीकडून शौचालयाचे बांधकाम केले आहे. यामुळे लाभार्थी यांना शौचालय अनुदान दिले नाही. शौचालय बांधकाम ज्या एजन्सीनी केले त्यांचे करारनामे व अदा केलेले प्रमाणके ठेवलेले नाहीत.

3) स्वच्छ भारत मिशन वैयक्तीक शौचालय योजनेवर प्रति लाभार्थी रु.12000/ रु. प्रमाणे 409 लाभार्थीचे संदर्भात रु.49,08,000/- निधी ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा आहे. परन्तु शौचालयाची कामे केलेल्या एजन्सींना नेमक्या कोणत्या लाभार्थीचे अनुदान दिले याची माहिती ग्रामपंचायतीने ठेवलेली नाही.
सदरील अभिलेखे ठेवण्याची जबाबदारी ही ग्रामसेवक ए.के. शेख यांची असुन लाभार्थीचे संमतीपत्र न घेता परस्पर रक्कम दुस-या व्यक्तीच्या नावे देउन प्रशासकीय अनियमितता केली आहे. सदर अनियमिततेस ग्रामसेवक ए. के. शेख, तत्कालीन सरपंच संतोष जाधव व सरपंच सौ.गिता गणेश वावरे व इतरांच्या कार्यकाळात मोठा आर्थिक गैरव्यवहार ग्रामपंचायत पिंपळगाव ता. गंगापुर हे दोषी असून, त्याच्या विरुद्ध नियमाप्रमाणे कारवाई प्रस्तावित करण्यात आली असताना . विद्यमान गट विकास अधिकारी गंगापूर यांनी भ्रष्ट ग्रामसेवक ए के शेख यांना घोडेगाव,सिध्देनाथवाढगाव,बुट्टेवाढगाव,वडाळी (खोफेश्वर, मेंडी) अशा मोठ्या गावाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली असेल तर मग इतर ग्रामसेवका बाबत भेद भाव का करण्यात येत आहे. असा सवाल शेतकरी नेते इंजी महेशभाई गुजर यांनी दि १३ एप्रिल २०२३ रोजी निवेदन दिले होते परंतु आज पर्यंत विद्यमान गटविकास अधिकारी गंगापूर यांनी कारवाई केली नसल्याने ग्रामसेवक अे के शेख यांना अभय दिले जात असल्याचा आरोप केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!